विरोधी पक्षनेते नाना काटे यांचा आरोप

पिंपरी –  पिंपरी चिंचवड शहर स्मार्ट सिटी करण्यासाठी महापालिकेतील नियमित होणा-या बैठका वारंवार पुढे ढकलण्यात येत आहेत. या बैठका घेण्यास कंपनीच्या अध्यक्षांना वेळ मिळेना झाला आहे. त्यामुळे स्मार्ट सिटी अंतर्गत होणारी कामे रखडली जात आहे. याबाब पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडच्या Project Committee च्या बैठका नियमितपणे घेण्यात याव्यात. अन्यथा स्मार्ट सिटी, नगरविकास मंत्रालय, दिल्लीचे सचिव कुणाल कुमार यांच्याकडे तक्रार करण्यात येईल, असा इशारा विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी दिला आहे.

यासंर्दभात दिलेल्या प्रसिध्दीपत्रकांत काटे यांनी म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा  स्मार्ट सिटी या योजनेसाठी   नगरविकास विभाग, केद्र शासन नवी दिल्ली यांच्याकडून सन २०१६ रोजी समावेश करण्यात आलेला आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात स्मार्ट सिटी अभियान राबविण्याकरीता  Smart City Proposal  तयार करण्यासाठी विविध माध्यमांतून शहरातील नागरिकांचे सहभागातून अभिप्राय / सुचना प्राप्त करुन घेऊन स्मार्ट सिटी प्रकल्पा अंतर्गंत पिंपरी चिंचवड शहराचा विकास करणे हा उद्देश आहे.

दिनांक १९/०५/२०१७ रोजी मा. महापालिकेने सभेने ठराव क्र. २९ दि. १९/०५/२०१७ अन्वये मान्यता दिलेली असून राज्य शासन निर्णयानुसार “पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड” या नावाने विशेष वहन (Special Purpose Vehicle)  दि. १३ जुलै २०१७ रोजी स्थापन करणेत आलेली असून  आज अखेर सात सभा संचालक मंडळाच्या घेण्यात आलेल्या आहेत. तर पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लि. च्या Project Committee च्या तीन बैठकी झालेल्या आहेत. व चौथी बैठक शनिवार दि. ०३/०८/२०१९ दु. १२ वाजता नियोजित होती ती आयत्या वेळी रद्द करुन सोमवार ५/८/२०१९ रोजी दुपारी ३ वाजता ठेवण्यात आली. तीही आयत्यावेळी रद्द करुन मंगळवारी दिनांक १३/०८/२०१९ रोजी दुपारी ३ वाजता ठेवण्यात आली होती. परंतु आजची बैठकही आयत्यावेळी रद्द करण्यात आली असून पुढील दिनांक कळविण्यात आलेला नाही.

पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी. ली. च्या Project Committee च्या बैठकी नियमितपणे होऊन वेगवेगळे प्रकल्प वेळेत मार्गी लागणे. हे महत्वाचे आहे. परंतु स्मार्टसिटीचे अध्यक्ष याबाबत  गंभीर नाहीत, असे यावरून दिसते त्यामुळे पिंपरी चिंचवड शहराच्या विकास कामांवर परीणाम होत आहे. त्यामुळे आपणांस विनंती आहे की, पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लि. च्या Project Committee च्या बैठकी नियमितपणे घेण्यात याव्यात. अन्यथा सदरबाबत मा. कुणाल कुमार, सह सचिव, स्मार्ट सिटी, नगरविकास मंत्रालय, दिल्ली यांच्याकडे तक्रार करण्यात येईल. असेही म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

seven + 4 =