पिंपरी (दि.13 फेब्रुवारी 2017) – निस्वार्थी समाजकारणाची परंपरा जपणारे तसेच भ्रष्टाचार आणि दहशतवादाविरूध्द लढा उभारण्याचा संकल्‍प केलेले प्रभाग क्र. 16 मधील कॉंग्रेसचे उमेदवार सचिन मुरलीधर साठे, भुलेश्वर नांदगुडे, मृणालताई पृथ्वीराज साठे, संजीवनी जगताप यांचे पॅनेल पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीत भरघोस मतांनी विजयी होईल, असा विश्वास शहराध्यक्ष सचिन साठे यांनी व्यक्‍त केला. प्रभाग क्र. 16 मधील उमेदवारांच्या संपर्क कार्यालयाचे उद्‌घाटन राजेंद्र कमलाकर साठे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस पृथ्वीराज साठे, नेताजी कस्पटे, अनंत कुंभार, लक्ष्मण रूपनर, संतोष साठे, माऊली साठे, बाळासाहेब जगताप, दत्तात्रय जगताप, मयुर जयस्वाल, विजय जगताप, गंगाधर कदम आदींसह शेकडो नागरिक उपस्थित होते.
यावेळी सचिन साठे बोलत होते.

भविष्याचा विचार करून प्रभागातील नागरिकांना भेडसावणा-या समस्यांवर नियोजनबध्द विकास करण्याचा संकल्‍प कॉंग्रेसने केला आहे. विद्यमान लोकप्रतिनिधींकडून या परिसरातील जनतेचा पूर्णपणे भ्रमनिरास झाला आहे. पुणे व पिंपरी चिंचवड या वेगाने विकसित होणा-या महानगरांना जोडणारे पिंपळे निलख हे गाव पूर्वीपासूनच दुर्लक्षित राहिले आहे. बीआरटी रस्‍त्‍यालगत असणारा हा परिसर असला तरी अंतर्गत भागातील सार्वजनिक वाहतुकीकडे दुर्लक्ष झाले आहे. याबरोबरच आरोग्‍य सुविधा तसेच पाण्याचे दुर्भिक्ष असल्‍यामुळे महिला-भगिनींच्या त्रासात आणखीनच भर पडली आहे. त्‍यामुळे पिंपळे निलख – वाकड मधील नागरिकांनी प्रभाग क्र. 16 मधील कॉंग्रेसचे उमेदवार सचिन मुरलीधर साठे, भुलेश्वर नांदगुडे, मृणालताई पृथ्वीराज साठे,  संजीवनी जगताप या स्वच्‍छ, चारित्र्यवान उमेदवारांना निवडून देण्याचा संकल्‍प जनतेने केला असल्याचेही सचिन साठे म्‍हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

one − 1 =