चौफेर न्यूज – स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु रामपाल यांना हरयाणामधील न्यायालयाने आणखी एका प्रकरणात बुधवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. नोव्हेंबर २०१४ मधील प्रकरणात न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे.

देशद्रोह आणि हत्येचा आरोप असलेल्या रामपालला ११ ऑक्टोबर रोजी हिस्सारमधील न्यायालयाने दोषी ठरवले होते. हत्येच्या दोन प्रकरणांमध्ये न्यायालयाने रामपालसह १४ जणांना दोषी ठरवले होते. यातील पहिल्या प्रकरणात मंगळवारी न्यायालयाने शिक्षा सुनावली होती. या प्रकरणात  त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. बुधवारी न्यायालयाने हत्येच्या दुसऱ्या प्रकरणातही जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

रामपाल याच्याविरुद्ध २००६ मध्ये देशद्रोह आणि हत्येचा खटला सुरु झाला. हत्येच्या आरोपावरुन रामपाल याला २०१४ मध्ये पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. पंजाब हरयाणा हायकोर्टाच्या आदेशानंतर पोलिसांचे पथक त्याला अटक करण्यासाठी गेले होते. त्यावेळी रामपालच्या समर्थकांनी पोलिसांना रोखले होते. जवळपास दोन आठवडे पोलीस आणि समर्थकांमध्ये हिंसाचार सुरुच होता. याच दरम्यान एका महिलेचा मृत्यू झाला होता. या प्रकरणातच न्यायालयाने रामपालला बुधवारी शिक्षा सुनावली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

two × one =