पिंपळनेर – येथील प्रचिती प्री- प्रायमरी स्कूलमध्ये स्वातंत्र्यदिनानिमीत्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. प्रमुख पाहुणे म्हणून सामोडे गावातील जवान अनिल घरटे उपस्थित होते. संचालन प्रमुख लीना पवार हिच्या नेतृत्वात परेड संचालनाद्वारे मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. यावेळी, शाळेच्या प्राचार्या वैशाली लाडे, समन्वयक राहुल अहिरे उपस्थित होते.

स्वातंत्र्यदिनानिमीत्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. तत्पूर्वी, सरस्वती मातेचे पूजन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते झाले. यावेळी, तिरंगी रंगात बनविलेल्या विविध वस्तुंच्या प्रदर्शनाने उद्घाटन प्रमुख पाहुण्यांनी केले. त्यानंतर, देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणाचे बलिदान देणाऱ्या थोर स्वातंत्र्य सेनानींच्या वेशभुषा साकारून विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात रंगत आणली. यामध्ये, नर्सरीचे विद्यार्थी सर्वेश खैरनार, पंडित नेहरू, आराध्या – सावित्रीबाई फुले, एलकेजी हिमानी – भारतमाता, हार्दिक – लो. टिळक, दुर्वा – राणी लक्ष्मीबाई फुले, भावेश कुवर – म. ज्योतिबा फुले, यश बागुल – शिवाजी महाराज यांनी महापुरुषांच्या वेशभुषा साकारल्या. स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देणारा सुंदर अशा फलकाचे रेखाटन यावेळी करण्यात आले. कार्यक्रमासाठी शाळेच्या प्राचार्य वैशाली लाउ, समन्वयक राहुल अहिरे, शिक्षीका कृषाली भदाणे, अनिता पाटील, अर्चना देसले, आश्विनी पगार, पूनम बिरारीस, निलीमा देसले, ज्योत्सना भदाणे, पूजा नेरकर, वर्षा भामरे तसेच शिक्षकेतर कर्मचारी माहेश्वरी अहिरे, जयेश घरटे, संगिता कोठावदे, सुरेखा खैरनार आदींनी सहकार्य केले. कृषाली भदाणे यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

13 − twelve =