पिंपरी चिंचवड ः  निगडी येथील भक्ती-शक्ती चौकाजवळील महावितरण कंपनीचे हायटेन्शन टॉवर पाऊस सुरू होण्यापूर्वी हलविण्यात यावे, अशी मागणी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे मनसेचे गटनेते तथा शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी केली आहे. यासंदर्भात आयुक्त श्रावण हार्डीकर यांना चिखले यांनी निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, भोसरी ते किवळे जाणार्‍या रस्त्यावर भक्ती-शक्ती चौकात उड्डाण पुल बांधण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी प्रचंड प्रमाणात खोदाई केली आहे. याठिकाणी महावितरण कंपनीची हायटेन्शन टॉवर रस्त्याच्या मधोमध असल्यामुळे कामाला अडथळा निर्माण होत आहे. टॉवरच्या बाजुने खोदकाम केल्यामुळे त्याखालील जमिनीची काही प्रमाणात पोकळी निर्माण झाली आहे. पावसाळ्यात पाऊस पडून जमीन भुसभुशीत झाल्यानंतर हा टॉवर कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ही दर्घटना घडू नये, यासाठी उपाययोजना म्हणून हा टॉवर तातडीने हलविण्याची गरज आहे, अशी मागणी चिखले यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

20 − 15 =