चिंचवड ः भरधाव अज्ञात ट्रकने दिलेल्या जोरादर धडकेत एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना गुरुवार (दि.18) रात्री अकराच्या सुमारास पुनावळे बेंगलोर- मुंबई महामार्गावर असलेल्या कोयते वस्ती पुलावर घडली.
बाळु श्रीरंग थोरात (वय 43, रा. हिंजवडी) असे मयत दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी बदाम मधुकर कांबळे (वय 34, रा. लक्ष्मीनगर, पिंपळे गुरव) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात ट्रकचालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री अकराच्या सुमारास फिर्यादी बदाम कांबळे यांचे मेहुणे बाळु थोरात हे त्यांच्या दुचाकी (क्र.एमएच/14/एपी/7456) वरुन कोयते वस्ती पुलावरुन त्यांच्या हिंजवडी येथील घरी चालले होते. यावेळी भरधाव अज्ञात ट्रकचालकाने थोरात यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या थोरात यांचा जागीच मृत्यू झाला. तर आरोपी ट्रकचालक ट्रकसह फरार झाला. हिंजवडी पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

three × 5 =