पिंपळनेर – येथील प्रचिती प्री प्रायमरी स्कूलमध्ये हिंदी दिवस मोठ्या उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. सबकी सखी है मेरी हिंदी, जैसे माथे पर सजी है सुंदर बिंदी.. असा हिंदी दिनाचा फलक लेखन करून हिंदी दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या वैशाली लाडे होत्या. शाळेचे व्यवस्थापक राहुल अहिरे यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तावित शिक्षिका ज्योस्त्ना भदाणे यांनी केले. तत्पूर्वी, सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. तसेच, उपस्थितांच्या हस्ते शिक्षकांच्या सत्काराचा कार्यक्रम पार पडला. हिंदी दिनाविषयी माहिती ज्योत्स्ना भदाणे यांनी दिली. हिंदुस्थानी है हम, गर्व करो हिंदी पर ‌! सन्मान देना, दिलाना कर्तव्य है हम पर !! खत्म हुआ विदेशी शासन, अब तोडो बेडियो को !! तह दिल से अपनाओ खुले आसमा को ! पन न छोडो धरती के प्यार को ! हिंदी है मातृतुल्य हमारी ! इस पर न्यौछावर करो जिंदगी सारी !! अशी हिंदी कविता त्यांनी सादर केली.

प्रसंगी, शाळेच्या शिक्षीका पूनम बिरारीस यांनी हिंदी ही आपली राष्ट्रभाषा असून हिंदीचा सन्मान करा. हिंदी भाषा ही एकता आणि अखंडता प्रस्तापित करते, असे सांगितले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी हिंदी कविता सादर करून आपला सहभाग नोंदविला. त्यानंतर, हिंदी हस्ताक्षर स्पर्धा घेण्यात आली. प्राचार्या वैशाली लाडे, समन्वयक राहुल अहिरे, शिक्षीका कृषाली भदाणे, अनीता पाटील, अर्चना देसले, निलीमा देसले, आश्विनी पगार, पूनम बिरारीस, ज्योस्ना भदाणे, पूजा नेरकर, वर्षा भामरे यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी माहेश्वरी अहिरे, जयेश धरटे, सुरेखा खैरनार यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार शिक्षीका वर्षा भामरे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

five + 9 =