चौफेर न्यूज – एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी देशाच्या विविध भागात हिंदू यात्रेकरुंना देण्यात येणारे आर्थिक साहाय्य आणि अनुदान केंद्र सरकारने थांबवावे असे आव्हान केले आहे. हज अनुदान रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्याच्या पार्श्वभूमीवर ओवेसी यांनी हे वक्तव्य केले आहे.

एकीकडे हज यात्रेकरुंना दिल्या जाणाऱ्या २०० कोटींच्या अनुदानाचा मुद्दा भाजप आणि आरएसएस करत याला अल्पसंख्यांकांचे तुष्टीकरण म्हणत आहेत तर दुसरीकडे देशातील विविध राज्यातील धार्मिक कार्यक्रमांना आणि यात्रेकरुंना शेकडो कोटींचे अनुदान देत आहे, असे म्हणत ओवेसी यांनी सरकारला फटकारले आहे.

सर्वोच्च न्यायालयाचे २०२२ पर्यंत टप्प्याटप्प्याने हज अनुदान रद्द करण्याचे आदेश असताना नरेंद्र मोदी सरकारला या मुद्यावर वादंग निर्माण करण्याची गरज नसल्याचे ओवेसी म्हणाले. भाजप सरकार केंद्रात आणि ज्या राज्यांमध्ये आहे अशा ठिकाणी भाजप सरकार अनुदान रद्द करणार का असा सवालही ओवेसी यांनी सरकारला केला आहे.

हज अनुदान जर तुष्टीकरण असेल तर २०१४ मध्ये कुंभ मेळ्यासाठी १ हजार १५० कोटी, सिंहस्थ महाकुंभ मेळ्यासाठी मोदी सरकारने दिलेले १०० कोटी तर मध्य प्रदेश सरकारने खर्च केलेले ३ हजार ४०० कोटी रुपये तुष्टीकरण नाही का? असा सवालही ओवेसी यांनी आरएसएस, पंतप्रधान नरेंद्र मोदींना केला.

उत्तर प्रदेशमध्ये देखील योगी सरकारने काशी, अयोध्या येथील आध्यात्मिक कार्यक्रमांसाठी ८०० कोटींचे अनुदान दिले होते. दरम्यान, मानसरोवर यात्रेसाठी दिली जाणारी १ लाख ५ हजारांच्या अनुदानाला देखील ओवेसी यांनी आव्हान दिले आहे. कर्नाटक, राजस्थान, गुजरात, हरियाणा ही राज्ये देत असलेल्या विविध अनुदानाचे दाखले देत हे अनुदान म्हणजे तुष्टीकरण नाही का असा सवाल ओवेसी यांनी केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

16 + twelve =