अपना वतन संघटनेची मागणी

निगडी : हिंदू देव – देवतांचा अपमान करून जाणीवपूर्वक हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्याप्रकरणी अमेझॉन या कंपनीवर भारतीय दंड संहिता कलम 295 अ नुसार तात्काळ गुन्हा दाखल करा, अशी मागणी अपना वतन संघटनेने वाकड पोलीस यांच्याकडे केली. भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. याठिकाणी अनेक जाती – धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. त्यांच्यामध्ये एकमेकांबद्दल आदर, बंधुभाव व प्रेम आहे. परंतु काही द्वेषमूलक प्रवृत्ती जाणीवपूर्वक वारंवार येथील सौख्याचे व आनंदाचे वातावरण बिघडवण्याच काम करतात. सध्या रमजानचा पवित्र महिना सुरु आहे. देशभरात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण आहे. या पवित्र महिन्यामध्ये अमेझॉन या इ – कॉमर्स वेबसाईट ने हिंदू धर्मांच्या देवदेवतांचा अतिशय चुकीच्या पद्धतीने अवमान केला आहे. हिंदू देव – देवतांचे चित्र असलेल्या टॉयलेट सीट व डोर मॅट ची जाहिरात व विक्री करण्यात येत आहे. या वस्तूंवर भगवान शंकर, गणपती, हनुमान, गौतम बुद्ध या देवतांचे चित्र दिसत आहे. यापूर्वीही अमेझॉनने भारतीय राष्ट्रध्वजचा अपमान केला होता. यावेळी हिंदू बांधवांच्या धार्मिक श्रद्धेचा अपमान करून धार्मिक भावना दुखवण्याच्या हेतूने जाणीवपूर्वक हिंदू देव – देवतांचे चित्र टोयलेट सीट व डोर मॅट वर टाकून गंभीर स्वरूपाचा अपराध केलेला आहे.

यामुळे समस्त भारतीयांच्या भावना दुखावल्या गेल्या असून जनतेमध्ये तीव्र रोष आहे. त्यामुळे अमेझॉन वर तातडीने गुन्हा दाखल होऊन कारवाई न झाल्यास जनतेच्या भावनांचा उद्रेक होऊ शकतो. याबाबतचे निवेदन अपना वतन संघटनेच्या वतीने वाकड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक. ज्ञानेश्‍वर साबळे यांना देण्यात आले. यावेळी संघटनेच्या शहराध्यक्ष राजश्री शिरवळकर, प्रवक्ते संद्रा डिसोझा, चिंचवड विभाग प्रमुख फारूख शेख, हमीद शेख, दिनेश पिंगळे, विशाल बोत्रे, स्वप्नील कसबे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

4 × 3 =