पिंपरी चिंचवड   :  पिंपरी येथे हॉटेलसमोर झालेल्या किरकोळ वादातून हितेश मुलचंदानी या तरुणाचा खून झाला. या खून प्रकरणातील पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली. तर सहावा आणि मुख्य आरोपी अद्याप फरार होता. फरार असलेल्या मुख्य आरोपीला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट दोनच्या पोलिसांनी सोमवारी (दि. 12) अटक केली.

शहाबाज शिराज कुरेशी (रा. कासारवाडी ) असे अटक केलेल्या मुख्य आरोपीचे नाव आहे. यापूर्वी पोलिसांनी अक्षय संजय भोसले उर्फ लिंगा (वय 25, रा. शितोळे नगर, जुनी सांगवी), योगेश विठ्ठल टोणपे उर्फ लंगडा (वय 20, रा. जगताप चाळ, पिंपळे गुरव), आमिन फिरोज खान (रा. मोमिनपुरा, गंजपेठ, पुणे), अरबाज मुन्ना शेख (वय 20, रा. खडकी) या यांना अटक केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

nineteen + 16 =