चौफेर न्यूज – गिरीश महाजनांना गुंड सांभाळायची सवय आहे, त्यामुळे मी बोलण त्यांना विनोदच वाटणार हे सहाजिक आहे. लोकांना हाताशी धरुन इव्हीएम मशिन मॅनेज करुन त्यांनी हा विजय मिळवला. किती इव्हीएम मॅनेज करणार आहोत याच नियोजन त्यांनी आधीच केलं होतं. धुळ्यातल्या भाजपाच्या विजयाला काल पैशाचा केलेला वापर कारणीभूत ठरला. त्यामुळे ही निवडणूक नाही तर धुळेकरांची फसवणूक आहे, असा थेट आरोप भाजपाचे बंडखोर आमदार अनिल गोटे यांनी केला आहे.

गोटे म्हणाले, धुळ्यात रांगा लावून पैशांच वाटप झालं. गिरीश महाजनांनी पोलिसांना मॅनेज केलं. ११ निवडणूक अधिकारी जळगाव जिल्ह्यातून बोलावण्यात आले होते. जर हे एवढे लोकप्रिय होते तर मुख्यमंत्र्यांच्या सभेला ५०० रुपये देऊन लोक का बोलावले, असा सवाल त्यांनी केला. धुळ्याची निवडणूक म्हणजे आपल्या पापावर विजयाचं झाकण घालण्याचा हा प्रकार आहे. महाजनांना लोकांनी मतदान केलं नाही, त्यांनी लोकसंग्रामला मतदान केलं आणि मशिननं भाजपाला मतदान केलं, असा दावाही त्यांनी यावेळी केला.

निवडणुकीच्या निकालाचा माझ्या भाषेचा काहीही संबंध नाही. माझी भाषा धुळ्यानं स्विकारली आहे. ज्याला ज्या भाषेत समजत त्या भाषेतच त्याला उत्तर द्याव लागतं. त्यामुळे माझ्या भाषेमुळं धुळेकरांनी मला नकारलं असं म्हणता येणार नाही. एकतर धुळ्याबद्दल महाजनांना काहीही माहिती नाही, त्यामुळे त्यांना धुळ्याबाबत कोणताही बोलण्यााच अधिकार नाही. महाजनासारखा लबाड आणि खोटा माणूस जगात नाही. मुख्यमंत्र्यांनीही माझी फसवणूक केली, त्यामुळे हे भाजपाचं नव्हे तर विश्वासघाताचं यश आहे, असा आरोपही गोटेंनी केला आहे.

गोटे म्हणाले, धुळ्यातला विजयाला ते भाजपाचा विजय म्ह्णत असतील तर अटलबिहारी वाजपेयींचा हा भाजपा आहे का? असा प्रश्न उपस्थित होतो. बलात्कारातील आरोपीला तुम्ही घरात लपवून ठेवता. ज्या लोकांनी पक्षात २०-२५ वर्षे काम केलं त्यांना उमेदावीर द्यायची नाही आणि नव्या आयात लोकांना उमेदवारी द्यायची आणि आमचा विजय सांगता यावरुन तुम्ही चुकीच्या गोष्टीचं समर्थन करताय. यातून महाराष्ट्रातल्या लोकांना आपण काय देणार आहोत. महाराष्ट्राला आपण विनाशाकडे घेऊन चाललोय, एकूणच भाजपातल्या गुन्हेगारांचा हा विजय आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

eight − 6 =