चौफेर न्यूज : वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांची यादी शुक्रवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, या यादीतील सर्वच उमेदवारांच्या नावापुढे त्यांच्या जातीचा उल्लेख करण्यात आला आहे. यावरून प्रकाश आंबेडकरांना प्रश्न विचारण्यात येऊ लागले होते. त्यावर, आंबडेकरांनी सांगितले, ही नवी पद्धत असून याने राजकारणाची दिशा बदलेल. असा विश्वास व्यक्त केला.

वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील ३७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. उमेदवारांची नावे घोषित करताना त्यांच्या नावापुढे कंसात समाजाचा उल्लेख करण्यात आला होता. आघाडीकडून वंजारी, बौद्ध, धिवर, माना आदिवासी, माळी, बंजारा, धनगर, मुस्लिम, कैकाडी, मातंग, शिंपी, कोळी, विश्वकर्मा, वडार, होलार, कुणबी, लिंगायत, भिल्ल, वारली, मराठा, आगरी अशा बहुतांश समांजांना प्रतिनिधित्व देण्यात आले आहे.

उमेदवारांच्या जातीबद्दल बोलताना आंबेडकर म्हणाले की, आज आम्ही जात जाहीर केली. कारण ही प्रणाली कोणताही पक्ष स्वीकारत नाही. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षात मराठ्यांव्यतिरिक्त कुणालाच उमेदवारी दिली जायची नाही. हीच पद्धत पुढे घराणेशाहीत बदलली. आज आम्ही त्यांना फक्त कार्यकर्ता म्हणूनच तिकिट दिले आहे. ही जातीअंताच्या लढाईचीच सुरुवात आहे, असे आंबेडकर यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ten + eleven =