चौफेर न्यूज – होळीचे विविध रंग उधळुन पिंपळनेर येथील प्रचिती प्री-प्रायमरी स्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी होळी साजरी केली. तसेच, फलक लेखन व होळीचे चित्र रेखाटून विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कृषाली भदाणे यांनी केले. अनिता पाटील यांनी होळीविषयी माहिती दिली. तसेच, विविध रंगांची ओळख करून दिली. या कार्यक्रमासाठी प्राचार्या वैशाली लाडे व समन्वयक राहुल अहिरे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षीका कृषाली भदाणे, पुनम तवर, अनिता पाटील, अर्चना देसले, निलीमा देसले, आश्विनी पगार, पूनम बिरारीस, माहेश्वरी अहिरे तसेच शिक्षकेतर कर्मचारी संगिता कोठावदे, जयेश घरटे यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

15 + 10 =