चौफेर न्यूज – मध्य प्रदेशमधील नीमच येथील एक गर्भश्रीमंत दाम्पत्य १०० कोटींची संपत्ती तसेच तीन वर्षाच्या मुलीला सोडून संन्यास घेणार आहेत. सुमीत राठौर व त्यांची पत्नी अनामिका या दोघांनी हा धाडसी निर्णय घेतला आहे. येत्या २३ सप्टेंबर रोजी गुजरातमधील साधूमार्गी जैन आचार्य रामपाल महाराज यांच्या देखरेखीखाली हा दीक्षांत समारंभ पार पडणार आहे.

नीमच शहरातील प्रतिष्ठीत आणि व्यावसायिक घराण्याशी संबंधित हे दाम्पत्य आपले ऐश्वर्य सोडणार आहेत. संन्यास घेण्यासाठी त्यांनी तीन वर्षाच्या मुलीलाही सोडण्याचा धाडसी निर्णय घेतलाय. तीन वर्षाच्या मुलीला सोडून संन्यास घेऊ नये यासाठी परिवारासह त्यांच्या मित्रांनी त्यांना खूप समजवण्याचा प्रयत्न केला परंतु दोघेही पती-पत्नी आपल्या निर्णयावर ठाम राहिले. हे दाम्पत्य गुरुवारी दीक्षा घेण्यासाठी गुजरातकडे रवाना झाले आहेत. सुमित राठौर यांनी लंडनमधून आयात-निर्यातसंबंधीचा डिप्लोमा केलेला आहे. दोन वर्ष लंडनमध्ये नोकरी केल्यानंतर नीमचला पोहोचल्यानंतर त्यांनी आपला व्यवसाय सांभाळला. सुमित यांच्या १० कोटींच्या कारखान्यात १०० लोक काम करतात. तसेच त्यांचे शेतीसह अनेक व्यवसाय आहेत.

सुमित यांची पत्नी अनामिका सुद्धा लहानपणापासून खूप हुशार विद्यार्थिनी राहिल्या आहेत. १० वी आणि १२ वीत टॉप केल्यानंतर त्यांनी आभियांत्रिकची पदवी मिळवली. हिंदुस्थान जिंकमध्ये ८ ते १० लाख रुपयांचं वर्षाला पॅकेजवर काम केल्यानंतर त्यांनी २०१२ साली नोकरी सोडली व सुमित यांच्याशी विवाह केला. आता सर्व ऐश्वर्य सोडून पतीसोबत संन्यास घेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

seven + 15 =