चौफेर न्यूज –  पिंपरी चिंचवड महापालिकेच्या थकीत मिळकत करावर आकारण्यात आलेल्या मनपा कर शास्तीमध्ये थकबाकीसह मिळकत कराची संपूर्ण रक्कम एक रक्कमी ०१ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर २०१८ अखेर भरणा करणा-या मिळकतधारकांना मनपाकर शास्ती रकमेच्या ९०टक्के सवलत मिळणार आहे. तर दि.१६ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर २०१८ अखेर भरणा करणा-या मिळकतधारकांना मनपाकर शास्ती रकमेच्या ७५ टक्के सवलत देण्याच्या अभय योजनेस स्थायी समितीने मान्यता दिली. तसेच शहरातील विविध विकास विषयक कामे करण्यासाठी येणा-या सुमारे ३४ कोटी २६ लाख रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

स्थायी समिती सभागृहात आज झालेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी ममता गायकवाड होत्या. मनपाच्या भोसरी येथील अंकुशराव लांडगे प्रेक्षागृह इमारतीमधील अग्निशमन यंत्रणेसाठी नविन रिंग मेन पाईप लाईन टाकणेकामी येणा-या सुमारे ५६ लाख १३ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली. काळेवाडी, रहाटणी भागातील पवना नदीच्या कडेने मुख्य गुरुत्व वाहिनीची सुधारणा विषयक कामे करण्यासाठी येणा-या सुमारे ४२ लाख ७८ हजार रुपयांच्या खर्चासही स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली.

झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प व झोपडपट्ट्या यांमधील अनधिकृत नळजोड नियमित करण्यासंबधीचा विषय महापालिका सभेपुढे ठेवणेस स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली. नवी सांगवी मुख्य जलनि:सारण नलिकामध्ये सुधारणा करण्यासाठी येणा-या सुमारे  ४९ लाख ७३ हजार रुपयांच्या खर्चासही स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली. पिंपरी चिंचवड मनपाचे विविध विभागांसाठी लेनोव्हा या उत्पादित कंपनीचे आवश्यक संगणक संच साहित्य खरेदी करण्यासाठी येणा-या सुमारे २५ लाख ४८  हजार रुपयांच्या खर्चासही स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली. बीआरटी कॉरीडॉर क्र.३ वर सुदर्शन नगर चौक येथे ग्रेड सेपरेटर (समतल विलगक) बांधण्यासाठी येणा-या सुमारे २५ कोटी ७३ लाख ५६ हजार रुपयांच्या खर्चासही स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली.

पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील सर्व बालवाड्यांच्या भिंती ३ डी पेंटिंगद्वारे बोलक्या करणेस स्थायी समितीने मान्यता दिली. १४ नोव्हेंबर च्या बालदिनानिमित्त पी.डब्ल्यू.डी. मैदान व भोसरी येथे दि. १३ व १४ नोव्हेंबर २०१८ रोजी बालजत्रेचे आयोजन करणेस स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महापौर चषक राज्यस्तरीय खो-खो स्पर्धा आयोजित करणेस स्थायी समिती बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने महापौर चषक जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धा आयोजित करणेस स्थायी समिती बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने महापौर चषक राज्यस्तरीय हॉलीबॉल स्पर्धा आयोजित करणेस स्थायी समिती बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली. मनपाच्या सर्व विभागांना उपयुक्त अशी पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील हवाई छायाचित्रे पुणे महानगरपालिका प्रादेश विकास प्राधिकरण यांचेकडून खरेदी करणेकामी येणा-या ५३ लाख ९३ हजार रुपयांच्या खर्चासही स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

sixteen + ten =