चौफेर न्यूज – पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) केंद्रीय माहिती आयोगाला (सीआयसी) नागरिकांच्या बॅंक खात्यात १५ लाख रुपये जमा होतील, या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घोषणेबाबत विचारलेला प्रश्न माहिती अधिकार कायद्यात (आरटीआय) येत नसल्यामुळे या प्रश्नाचे उत्तर देता येणार नसल्याचे म्हटले आहे. १५ लाख रुपये नेमके कोणत्या तारखेला नागरिकांच्या बॅंक खात्यात जमा होणार याबाबत माहिती अधिकाराद्वारे विचारणा करण्यात आली होती.

नोटबंदीच्या घोषणेच्या १८ दिवसांनंतर म्हणजे २६ नोव्हेंबर २०१६ रोजी आरटीआयअंतर्गत मोहन कुमार शर्मा यांनी १५ लाख रुपयांबाबत माहिती मागितली होती. पंतप्रधान मोदींच्या घोषणेनुसार प्रत्येक नागरिकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा होण्यास नेमकी केव्हापासून सुरूवात होणार अशी विचारणा शर्मा यांनी केली होती.

पंतप्रधान कार्यालय आणि रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने याबाबत तपशीलवार माहिती दिली नाही अशी तक्रारही शर्मा यांनी केंद्रीय माहिती आयोगाचे प्रमुख (सीआयसी) आरके माथुर यांना केली होती. त्यावर, आरटीआय कायद्याच्या सेक्शन २(एफ) अंतर्गत ही माहिती येत नसल्यामुळे या प्रश्नाचे उत्तर देता येणार नसल्याचे उत्तर पंतप्रधान कार्यालयाकडून केंद्रीय माहिती आयोगाला मिळाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

seventeen − six =