चौफेर न्यूज – दिल्लीला संपूर्ण राज्याचा दर्जा देण्यासाठी आप सरकारकडून दाखल करण्यात आलेला प्रस्ताव आज (सोमवार) विधानसभेत मंजूर करण्यात आला. दिल्लीला संपूर्ण राज्याचा दर्जा मिळाला तर २०१९ च्या निवडणुकीत आपण भाजपासाठी प्रचार करू अशी घोषणा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली. उल्लेखनीय म्हणजे दिल्लीच्या प्रशासकीय कामकाजावरून दिल्ली सरकार आणि नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्यात सध्या तणावाचे वातावरण आहे. याचदरम्यान सरकारने संपूर्ण राज्याचा दर्जा देण्याची आपली जुनी मागणी पुन्हा एकदा पुढे केली आहे.

केजरीवाल विधानसभेत म्हणाले की, मी भाजपाला सांगू इच्छितो की, जर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी दिल्लीला संपूर्ण राज्याचा दर्जा देण्यात आला तर तुम्हाला दिल्लीतील प्रत्येक मत मिळवून देण्याची जबाबदारी घेऊ. आम्ही सर्वजण तुमचा प्रचार करू. जर तुम्ही असे केले नाही तर दिल्लीतील जनता ‘भाजपा दिल्ली छोडो’चे फलक घेऊन फिरतील.

दिल्लीला संपूर्ण राज्याचा दर्जा देण्याची मागणीचा मुद्दा पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. यासाठी आपने ३०० हून अधिक सभा घेण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे भाजपाबरोबर काँग्रेसनेही आपच्या या मागणीवर टीका केली आहे. काम न करण्यासाठीचे हे कारण असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

16 − 9 =