कासारे – एसटी बसेस विना अपघात चालवा, अपघात टाळा, प्रवासी सुरक्षीत ठेवा, अशी मागणी साक्री तालुका प्रवासी महासंघाच्यावतीने राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडे करण्यात आली आहे. साक्री तालुका प्रवासी महासंघाचे अध्यक्ष सुरेश पारख, सचिव बाळकृष्ण तोरवणे, उपाध्यक्ष मंगला पारख, डॉ. दिलीप चोरडीया, कोषाध्यक्ष पी.झेड.कुवर, प्राचार्य बी.एम.भामारे, पी.बी.गांगुर्डे, विलास देसले, सुहास सोनवणे,  विजय भोसले, भटू वाणी, डॉ. राजेंद्र अहिरे, साहेबचंद कर्नावट, आर.व्ही.भदाणे, ॲड. नरेंद्र मराठे, सुरेखा शिंदे आदींच्या हस्ते साक्री आगार प्रमुख पंकज देवरे यांना निवेदन देण्यात आले आहे.

त्यात म्हटले आहे की, महामंडळांच्या बसेसचे अपघात प्रमाण खूपच वाढले आहे. दि. १५ सप्टेंबर रोजी साक्री – नाशिक बस क्र.एम.एच.१४ बीटी-२६९ शेलबारी येथे अपघात झाला. यात २९ प्रवासी जखमी झाले. तसेच, नंदुरबार आगाराच्या बसचा भावडबारी घाटात अपघात झाला. त्यात ४ ठार १२ जखमी झाले होते. तसेच, नाशिक औरंगाबाद शिवशाही बसच्या अपघातात १ ठार २० जण जखमी झाल्याची घटना घडली होती. त्याचप्रमाणे महाराष्ट राज्यात असे अनेक अपघात घडत असतात. हे प्रकार थांबविणे आवश्यक आहे. एसटी चालकांच्या बेपर्वाईमुळे अनेक अपघात घडतात. त्यामुळे वाहने आणि प्रवाशांचे जिव धोक्यात येतात. तरी, महामंडळाकडून कर्मचाऱ्यांना योग्य प्रशिक्षण देण्यात यावे, असे निवेदनात नमूद आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

1 + 7 =