साक्री – प्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये गोवर, रुबेला लसीकरण मोहीम यशस्वीरित्या राबविण्यात आली. यावेळी कलंबीर ग्रामीण रुग्णालयातील डॉ. आशितोष साळुंखे, एस.आर.परदेशी, डी.एस.भामरे यांच्या सहकार्यांनी विद्यार्थ्यांनी लसीकरण झाले. इ.१ ली ते १० वी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना लस देण्यात आली. याप्रसंगी शाळेचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत भिमराव पाटील, स्कूलचे प्राचार्य अतुल देव, व्यवस्थापक तुषार देवरे उपस्थित होते. धुळे जिल्हा परिषद आरोग्य विभाग आणि मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच जिल्हाधिकारी यांच्या सहकार्याने आणि महापालिका आयुक्त, धुळे शहर व सर्व गावांतील, वाडी,  वस्ती, पाड्यांवरील नऊ ते पंधरा वर्षातील सर्व लाभार्थ्यांना आरोग्य विभागातर्फे गोवर, रुबेला लस मोहिम राबविण्यात येत आहे.

एखाद्या चांगल्या मोहीमेची सुरुवात होण्या अगोदर “अफवा” ह्या हवेतून पसरणाऱ्या जंतुपेक्षा अधिक वेगाने आधी पोहचतात. ह्या लसीबाबत आजूबाजुला असणाऱ्या पालकांच्या मनात गैरसमज असतील. तर त्यांची समजूत घालून त्यांना लस घेऊन बालकांना सुरक्षित करण्यास सांगण्याचे आवाहन शाळेचे चेअरमन प्रशांत पाटील यांनी केले. या मोहिमेसाठी शाळेतील शिक्षिका गितल कोठावदे, वैशाली खैरनार यांनी लसीकरणानंतर विद्यार्थ्यांनी घ्यावयाची काळजी याबद्दल मार्गदर्शन घेतले. या मोहीमेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभले. प्रचिती इंटरनॅशनल स्कूलच्या सर्व विद्यार्थ्यांना लसीकरण करण्यात आले. यावेळी विद्यार्थी पालक उपस्थित होते. यावेळी सर्व विद्यार्थ्यांना लस देण्यात आली.  ही लस “9 महीने ते 15 वर्षपर्यंतच्या सर्व बालकांना देण्यात येत आहे.

लसीकरणास पालकांचा उत्स्फुर्त सहभाग –

–  आतापर्यंत 9 कोटी 60 लाख बालकांना भारतात हि लस दिली गेलेली आहे.

–  आतापर्यंत 9 राज्यांमध्ये हि M/R ची मोहीम राबविली गेली आहे. कोठेही याचे दुष्परिणाम दिसून आलेले नाही.

–  हि लस 10 डोसेसची आहे.

–  हि मोहीम 5 आठवडे चालणार आहे.

–  ही लस एडी सिरिंज द्वारे दिली जाते.

–  सिरिंज एकदा वपरात आल्यावर आपोआप lock होऊन त्या सिरिंज चा वापर पुन्हा करता येत नाही.  शासकीय रुग्णालयांमध्ये ही उपलब्ध असते.

 

लक्षणे  –

जर गर्भवती मातेला गोवर झाल्यास तिच्या होण्याऱ्या बाळास हा आजार होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे त्या बाळास खालील आजार होण्याची दाट शक्यता असू शकते.

–  बाळाचा मेंदू छोटा असू शकतो.

–  बाळ जन्मताच अपंग असू शकते.

– बाळाचे डोळे तिरपे तसेच डोळ्यात टिक असू शकते.

– बाळाला M/R लस न दिल्यामुळे संपूर्ण भारतात 50,000 बालके मृत्यू पावतात.

–  बाळास आंधळे पणा सुद्धा येऊ शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

fourteen − six =