फोटो – कुलर

इनरव्हिल क्लब ऑफ निगडीच्यावतीने अभ्यासिकेस पाण्याचा कुलर भेटचौफेर न्यूज – इनरव्हिल क्लब ऑफ निगडीच्यावतीने निगडी प्राधिकरण येथील गजानन मंदिर ट्रस्टच्यावतीने चालविण्यात येणा-या अभ्यासिकेस  पाण्याचा कुलर भेट म्हणून देण्यात आला. यावेळी इनरव्हिल क्लब ऑफ निगडीच्या अध्यक्षा प्रतिभा जोशी दलाल, सचिव रेखा मित्रागोत्री, स्मिता इळवे, नेहा देशमुख, माजी अध्यक्षा मुक्ती पानसे, सोनाली जयंत, नेहा देशमुख, माधुरी बारकुले, अर्जुन दलाल आदी उपस्थित होते.

निगडी प्राधिकरण येथे गजानन महाराज मंदिर ट्रस्टच्या माध्यमातून अभ्यासिका चालविली जात आहे. मात्र, या अभ्यासिकेस मिळणारा विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणात आहे. अभ्यासिकेमध्ये एक हजार विद्यार्थी आहेत. त्यांचा पिण्याच्या पाण्याचा कुलर इनरव्हिल क्लब ऑफ निगडीच्यावतीने पिण्याचा पाण्याचा प्रश्‍न  सोडविला. विद्यार्थ्यांना  स्वच्छ  पाणी पिण्यासाठी मिळावे या हेतुने  पाण्याचा कुलर  भेट देण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

6 − 4 =