पिंपरी चिंचवड ः दुकानात विक्रीसाठी मागवलेले 27 लाख 85 हजार रुपये किमतीचे महागडे 65 मोबाईल फोन घेऊन डिलिव्हरी बॉयने पलायन केले. ही घटना 8 एप्रिल ते 21 एप्रिल यादरम्यान पिंपरी येथे घडली. अमित कुमार सुरेश कुमार जैन रा. गोरेगाव, वेस्ट मुंबई असे पळून गेलेल्या आरोपीचे नाव आहे. अमित हिरानंद आसवाणी वय 23, रा. पिंपरी यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. हिरानंद आसवाणी हे पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी उपमहापौर आहेत. त्यांच्या मुलाचे पिंपरीमधील साई चौकात पियुष मोबाइल कॅफे हे दुकान आहे. पोलीस उपनिरीक्षक अशोक निमगिरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित यांनी मुंबईमधील डीलरकडून आयफोन एक्स कंपनीचे 35 मोबाईल आणि एमआय नोट्स 7 प्रो कंपनीचे 30 मोबाईल असे एकूण 65 मोबाईल फोन मागवले होते. हे 27 लाख 85 हजार रुपये किमतीचे मोबाईल फोन अमितकुमार जैन हा घेऊन येणार होता. मात्र त्याने मोबाईल फोनची डिलिव्हरी न देता पलायन केले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून पिंपरी पोलिस तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

16 − 16 =