प्रचिती प्री-प्रायमरी स्कुल, पिंपळनेर येथे 68 वा प्रजासत्ताक दिन जयघोषात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहूणे म्हणून श्री.डॉ. निलेश भामरे हे उपस्थित होते. या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून मैदान व झेंड्याच्या चौफेर आकर्षक व देखणी अशी रांगोळी रेखाटन करण्यात आली. पहिलीच्या विद्यार्थ्यांनी पाहुण्यांचे पदसंचलन करून स्वागत केले.

प्रथमतः ध्वजारोहण झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत गायली. श्रीमती पुनम तवर यांनी सूत्रसंचालन केले. याप्रसंगी यु.के.जी व पहिलीच्या विद्यार्थ्यांची भाषणे झाली. प्रजासत्ताक म्हणजे काय? हे श्रीमती अनिता पाटील मॅडम यांनी आपल्या भाषणांतून विद्यार्थ्यांना पटवून सांगितले. तसेच श्रीमती निलीमा देसले मॅडम यांनी कारगिलच्या शहीद झालेल्या जवानांवर एक गीत सादर केले. झेंड्याच्या तीन रंगाचे महत्व सांगताना प्राचार्य श्री. मोहन गावीत सरांनी विद्यार्थ्यांना यथायोग्य असे मार्गदर्शन केले. याप्रसंगी शाळेचे समन्वक श्री. राहूल अहीरे उपस्थित होते.

प्रमुख पाहूणे श्री.डॉ. निलेश भामरे सरांनी आपल्या भाषणांतून विद्यार्थ्यांना देश व स्वातंत्र् या गोष्टींचे स्पष्टीकरण केले तसेच देशाचे आपण काहीतरी देणे लागतो व देशासाठी काही चांगल्या गोष्टी कराव्यात असे मार्गदर्शन केले.

आलेल्या पाहूणंचे आभार श्रीमती कृषाली भदाणे यांनी मांडले. श्रीमती प्रतिभा अहिरराव मॅडम उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या आयोजनास जयेश घरटे व संगिता कोठावदे यांनी मदत केली.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

eight − seven =