पिंपरी : काम, क्रोध, मोह, मद, मत्सर या षड्रिपुंनी ग्रासलेल्या जीवनातील अविवेकाची काजळी या दीप महोत्सवाने दूर करु या, ज्या प्रमाणे भगवान शंकराने त्रिपूरारी राक्षसाचा या पौर्णिमेच्या दिवशी वध करुन राक्षसी विचारांचे पतन केले. त्याचप्रमाणे आपण आपल्या जीवनातील या षड् रिपुंनी राक्षसाचा नाश करुन जीवनाचा आनंद घ्यावा आणि दिपाप्रमाणे दाहीदिशा प्रज्वलीत करुन आनंदाची मुक्त उधळण करावी, असे मार्गदर्शन ह.भ.प. किसन महाराज चौधरी यांनी केले.

चिंचवड गावातील संवेदना प्रतिष्ठानच्या वतीने संयोजक व माजी नगरसेवक सुर्यकांत उर्फ नाना थोरात, सुमन (नानी) थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सलग चौदाव्या वर्षी मोरया गोसावी मंदिरात दिपमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी व्यासपीठावर माजी महापौर अनिता फरांदे, ह.भ.प. चंद्रकांत महाराज वांजळे, विघ्नहरी देव महाराज, वैशाली देव, मंदार देव महाराज, ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर, नगरसेविका अश्‍विनी चिंचवडे, आशा सुर्यवंशी, संयोजक व माजी नगरसेवक सुर्यकांत उर्फ नाना थोरात, सुमन (नानी) थोरात, ज्येष्ठ पत्रकार विजय भोसले, माजी नगरसेवक मधूकर चिंचवडे, हरीभाऊ तिकोणे, स्विकृत सदस्य शरद लुणावत, निळकंठ चिंचवडे, पै. विजय गावडे, कृष्णाजी जगताप, राहुल भोईर, महावीर पांढरे, सुरेश भोईर आदी उपस्थित होते.

यावेळी संवेदना प्रतिष्ठानच्या सुमन (नानी ) थोरात, माया थोरात, अश्‍विनी थोरात, मनिषा बेंद्रे, श्रध्दा भोईर, स्वप्नाली आदमाने, मनिषा गाढवे, कल्पना चिंचवडे, उल्फा घोलप, शिल्पा पवार, रेश्मा जमदाडे आदींनी उपस्थित महिलांचे ओटीचे सामान देऊन स्वागत केले. ह.भ.प. चंद्रकांत महाराज वांजळे आणि विघ्नहरी देव महाराज यांनी उपस्थितांना शुभेच्छा दिल्या.

स्वागत संवेदना प्रतिष्ठानचे अध्यक्ष संयोजक व माजी नगरसेवक सूर्यकांत उर्फ नाना थोरात यांनी केले. प्रास्ताविक श्रीधर वाल्हेकर, सूत्रसंचालन कैलास गावडे, आभार अंबर चिंचवडे यांनी मानले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here