खान्देश मराठा मंडळाच्या कार्यकारिणीची निवड

पिंपरी : येथील खान्देश मराठा मंडळाच्या अध्यक्षपदी गंगाराम सखाराम पाटील यांची निवड करण्यात आली. मंडळाच्या सेक्रेरटरीपदी मिलिंद पाटील यांची निवड करण्यात आली.

मंडळाच्या निगडी प्राधिकरणातील काचघर चौक येथील कार्यालयात सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. मंडळाचे मावळते अध्यक्ष माधव पवार सभेच्या अध्यक्षस्थानी होते. मंडळाचे पदाधिकारी आणि सदस्य या वेळी

उपस्थित होते.

मंडळाच्या कार्यकारिणीची या वेळी एकमताने निवड करण्यात आली. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा या वेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

मंडळाची नवीन कार्यकारिणी पुढील प्रमाणे : अध्यक्ष – गंगाराम पाटील, उपाध्यक्ष –  गुलाबराव सदाशिव पाटील, मधुकर पगार, सेक्रेटरी – मिलिंद पाटील, सहसेक्रेटरी – आधार पाटील, खजिनदार – माधव पवार, संचालक – भगवान पाटील, सयाजीराव पाटील, भिकन पाटील, भास्कर पाटील, उमेश बोरसे, सल्लागार – संतोष पाटील, युवराज साळुंके, हंबीरराव चव्हाण, अशोक अहिरराव.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here