पुणे : मध्यरात्री बारा नंतरही पुण्याच्या रस्त्यावरुन धावणारी रातराणी आता पिंपरी-चिंचवडमधूनही धावणार आहे. येत्या जानेवारी पासून निगडी येथून पुणे स्टेशन, स्वारगेट असे तिचे मार्ग असणार आहेत त्यामुळे रात्री तुम्हाला पुण्यात जायचे असेल किंवा पुण्यातून पिंपरी-चिंचवडला यायचे असेल तर नागरिकांना सोयीचे होणार आहे.
पिंपरी-चिंचवडकरांना हे नवीन वर्षाचे गीफ्ट असणार आहे कारण ही रातराणी 1 जानेवारी 2017 पासून सुरु करण्यात येणार आहे. ज्यामध्ये पुणे स्टेशन – निगडी (औंध मार्गे), पुणे स्टेशन- एनडीए गेट,स्वारगेट- निगडी (बाजीराव रोड- मुंबई, पुणे रस्त्यामार्गे), स्वारगेट- धायरी, पुणे स्टेशन- वाघोली या मार्गांवर बससेवा सुरू होणार आहे. रात्री बारानंतर सकाळी सहा वाजेपर्यंत ही बससेवा उपलब्ध राहणार आहे. यासाठी एकूण 9 मार्गावर 18 बस धावतील ज्यांच्या एकूण 100 फेऱ्या होणे अपेक्षीत आहे.
रात्रीच्या वेळी रिक्षाला 500 रुपये देण्यापेक्षा सुरक्षीत व अवघ्या 30 रुपयाच तुम्हाला पीएमपी शहराच्या कानाकोपऱ्यात पोहचवत असल्याने नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळतो म्हणून आम्ही निगडी मार्गावरही बस रातराणी सुरू करत आहोत. या आधी साधारण दहा वर्षापासून स्वारगेट- हडपसर, पुणे स्टेशन- हडपसर, कात्रज- शिवाजीनगर, कात्रज- पुणे स्टेशन या मार्गांवर रात्र बससेवा सुरू आहे.