पिंपरी : स्वराज्य अभियानाचे नेते तथा पिंपरी – चिंचवडचे माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पुन्हा शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. भापकर पूर्वी शिवसेनेत होते. मात्र, त्यांची हकालपट्टी करण्यात आली होती.
मुंबई येथे हा प्रवेश सोहळा झाला. यावेळी शिवसेनेचे पुणे जिल्हा संपर्क प्रमुख अमोल कोल्हे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार गौतम चाबुकस्वार, शहरप्रमुख राहुल कलाटे, नगरसेविका सुलभा उबाळे, योगेश बाबर आदी उपस्थित होते.
भापकर यांच्यासोबतच पिंपरी महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते दत्तात्रय वाघेरे, माजी नगरसेवक प्रदिप झुंबरे, सामाजिक कार्यकर्ते किरण वाघेरे, प्रतिभा जोशी, विकास भुंबे, भारती विकास भुंबे आदींनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.