पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या  2016-17 या वर्षाची मिळकतकराची बीले वाटप करण्यात आली असून, मालमत्ता कर हा 1 एप्रिल व 1 ऑक्टोबर 2017 मध्ये सुरू होणाऱ्या सहामाही हिस्स्याने आगाऊ देय असतो. त्यानुसार थकबाकीसह पहिल्या सहामाही व दुसऱ्या सहामाहीची रक्कम 31 डिसेंबर 2016 अखेर भरणे आवश्यक आहे. त्यामुळे करधारकांकडे आता थकबाकीसाठी शेवटचे आठ दिवस उरले आहेत.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका करआकारणी व करसंकलन विभागामार्फत शहरातील इमारत व जमिनीवर मालमत्ता कराची आकारणी करण्यात येते. त्यानुसार  31 डिसेंबर 2016 अखेर मिळकतधारक किंवा भोगवाटादार यांनी थकबाकीसह संपूर्ण मिळकत कर बिलाची रक्कम भरणा केला नाहीतर थकीत थकबाकीसह पहिल्या व दुस-या सहामाही अखेरच्या रक्कमेमधील मनपा करावर दरमहा 2 टक्के तर शासन करावर वार्षिक 10 टक्के शास्ती व व्याजाची आकारणी 1 जानेवारी 2017 पासून केली जाणार आहे.

महापालिकेच्या 16 कर आकारणी कार्यालयामध्ये साप्ताहिक सुट्टीच्या दिवशीही सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत सुरु राहणार आहे, तरी मिळकतधारकांनी 31 डिसेंबरपूर्वी  थकबाकीसह संपूर्ण बिलाची रक्कम भरुन शास्ती टाळावी, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

तर काल अखेर (दि. 23) 4 लाख 44 हजार 709 मिळकतींच्या नोंदी झालेल्या आहेत. त्यापैकी 2लाख 73 हजार 931 मिळकत धारकांकडून 311.58 कोटी मिळकतकराचा भरणा केला आहे. हा भरणा मागील वर्षीच्या झालेल्या भरण्यापेक्षा 47.25 कोटीने जास्त आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here