दिनांक : ०४ जानेवारी २०१७ – सध्याच्या धकाधकीच्या जीवनात काम करत असताना शहरातील नागरिकांसाठी
आवश्यक ध्यानधारणा केंद्र, ओपन जिम, क्रीडांगणे व उद्याने विकसीत करून शहरासाठी जे जे आवश्यक आहे, ती
कामे सातत्याने करण्याचा प्रयत्न असल्याचे मत महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंञी अजितदादा पवार यांनी
व्यक्त केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने मंगळवार दि. ०३ जानेवारी २०१७ रोजी शहरात विविध विकास
प्रकल्पांचे भूमीपूजन व उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. तसेच भक्ती शक्ती उद्यानात उभारण्यात येणा-या १०७ मीटर
उंचीच्या राष्ट्रीय ध्वज उभारणीच्या कामाचा शुभारंभ, प्रभाग क्र. ५५ पिंपळे सौदागर येथील रोजलॅंन्ड रेसीडेन्सी
जवळील उद्यानाच्या कामाचे भूमीपूजन, प्रभाग क्र. ५९ सांगवी येथील मधुबन सोसायटी मधील अंतर्गत रस्ते व
सिमेंट रोड या कामाचे भुमीपूजन तसेच प्रभाग क्र. ६० सांगवी येथील स्व. तानाजीराव शितोळे (सरकार) शिवसृष्टी
उद्यानातील ध्यानधारणा केंद्राचे लोकार्पण त्यांच्या हस्ते झाले त्यावेळी सांगवी येथे झालेल्या सभेत ते बोलत होते.
महापौर शकुंतला धराडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास माजी आमदार विलास लांडे,
उपमहापौर प्रभाकर वाघेरे, सत्तारुढ पक्षनेत्या मंगलाताई कदम, शहर सुधारणा समिती सभापती प्रतिभा भालेराव, जैव
विविधता व्यवस्थापन समिती अध्यक्ष मोरेश्वर भोंडवे, अ प्रभाग अध्यक्ष निलेश पांढरकर, ब प्रभाग अध्यक्षा आशा
सुर्यवंशी, क प्रभाग अध्यक्षा शैलजा शितोळे, ड प्रभाग अध्यक्ष अरूण टाक, फ प्रभाग अध्यक्षा मंदाकिनी ठाकरे,
माजी महापौर आझम पानसरे, संजोग वाघेरे, योगेश बहल, आर.एस.कुमार, अनिता फरांदे, माजी स्थायी सभापती
हनुमंत गावडे, नगरसदस्य राजेंद्र काटे, संजय काटे, निलेश बारणे, अतुल शितोळे, प्रसाद शेट्टी, कैलास थोपटे,
तानाजी खाडे, ॲड. गोरक्ष लोखंडे, राजु मिसाळ, दत्तात्रय साने, बाबासाहेब धुमाळ, नगरसदस्या नंदा ताकवणे, भारती
फरांदे, शितल काटे, सुषमा तनपुरे, सोनाली जम, सुजाता पालांडे, वैशाली काळभोर, सुभद्रा ठोंबरे, माजी नगरसदस्य
महंमदभाई पानसरे, नाना काटे, श्रीधर वाल्हेकर, मनोहर शिंगाडे, ज्ञानेश्वर भालेराव, ईश्वर ठोंबरे, शंकर पांढरकर,
उत्तम हिरवे, सतिश दरेकर, हरिभाऊ तिकोणे, जगदिश शेट्टी, माजी नगरसदस्या सुमन पवळे, कमरुन्नीसा खान,
रेखा गावडे यांच्यासह सर्व सन्मानीय नगरसदस्य, नगरसदस्या आदी मान्यवर उपस्थित होते.
सायंकाळी ४.०० वाजता प्रभाग क्र. १४ भक्ती शक्ती उद्यानात उभारण्यात येणा-या १०७ मीटर उंचीच्या
राष्ट्रीय ध्वज उभारणी कामाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी माजी महापौर आर. एस. कुमार,
नगरसदस्या भारती फरांदे आदी मान्यवर उपस्थित होते.
तर सायंकाळी ५.०० वाजता प्रभाग क्र. ५५ पिंपळे सौदागर येथील रोजलॅंन्ड रेसीडेन्सी जवळील उद्यानाच्या
कामाचे भूमीपूजन त्यांच्या हस्ते झाले यावेळी नगरसदस्या शितल काटे, माजी नगरसदस्य नाना काटे आदि मान्यवर
उपस्थित होते.
तसेच सायंकाळी ६.०० वाजता प्रभाग क्र. ५९ सांगवी येथील मधुबन सोसायटी मधील अंतर्गत रस्ते व
सिमेंट रोड या कामाचे भुमीपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरसदस्य अतुल शितोळे, नगरसदस्या
सुषमा तनपुरे, नगरसदस्य ॲड. गोरक्ष लोखंडे, माजी नगरसदस्य उत्तम हिरवे, श्रीधर वाल्हेकर, नाना काटे आदी
मान्यवर उपस्थित होते.
तर सायंकाळी प्रभाग क्र. ६० सांगवी येथील स्व. तानाजीराव शितोळे शिवसृष्टी उद्यानातील ध्यानधारणा
केंद्राचे लोकार्पण त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरसदस्य प्रशांत शितोळे, नगरसदस्या सोनाली जम, प्रभाग
सदस्य गणेश ढोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमांवेळी अजितदादा पवार म्हणाले, निगडी ते काञज मेट्रो झाल्यास शहरवासियांसाठी त्यांचा
फायदा होईल. चांगले पुल, प्रशस्त रस्ते, भव्य उद्याने व क्रीडांगणे ही शहराच्या विकासासाठीची अभिमानास्पद बाब
आहे. तसेच भक्ती शक्ती उद्यानात उभारण्यात येणारा १०७ मीटर उंचीचा राष्ट्रीय ध्वज दिवसराञ फडकत राहील.
त्यावर विद्युत रोषणाई करण्यात येणार असून यामुळे नवीन पिढीच्या मनात देशभक्तीची भावना व राष्ट्रवादाची
भावना रूढ होण्यास मदत होईल. हा ध्वज देशातील सर्वांत उंच ध्वज म्हणून नावलौकिकास येईल, असेही ते
म्हृणाले.
ज्ञानज्योती साविञीबाईं फुले यांनी लावलेल्या ज्ञानदिपामुळेच महाराष्ट्र प्रकाशमय झाला. महिलांसाठी
शिक्षणाची कवाडे उघडली गेली पाहिजे, अशी भुमिका त्याकाळी त्यांनी घेतली होती. समाज पुढे नेण्यासाठी महिलांनी
शिकले पाहिजे. सबवे, स्काय वॉक, फुटपाथ यासह शहरात जे जे आवश्यक आहे ते ते काम करण्याचा प्रयत्न चालू
आहे. सिमेंट कॉंक्रीटचा रस्ता केल्यास किमान २५ वर्षे त्याचे मेंटेनंन्स करण्याची गरज भासणार नाही. पिंपरी चिंचवड
हे झोपडपट्टी विरहित शहर बनवण्याचे प्रयत्न असल्याचेही ते म्हणाले.
कार्यक्रमाचे सुञसंचालन क्षेञील अधिकारी आण्णा बोदडे यांनी केले. तर आभार नगरसदस्या सोनाली जम यांनी मानले.