दिनांक : ०२ जानेवारी २०१७ – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरात विविध विकास
प्रकल्पांचे भूमीपूजन व उद्घाटन माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते मंगळवार, दि.०३
जानेवारी २०१७ रोजी सकाळी ९.३० वाजल्यापासून होणार असल्याचे महापौर शकुंतला धराडे यांनी
सांगितले.
महापौर शंकुतला धराडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणा-या या कार्यक्रमास पालकमंञी
गिरीष बापट, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, श्रीरंग उर्फ आप्पा बारणे, सुप्रिया सुळे, अमर
साबळे तसेच कार्यक्रमास आमदार लक्ष्मण जगताप, ॲड. गौतम चाबुकस्वार, महेश लांडगे, उपमहापौर
प्रभाकर वाघेरे, स्थायी समिती सभापती हिरानंद ऊर्फ डब्बू आसवाणी, सत्तारुढ पक्षनेत्या मंगलाताई
कदम, आयुक्त दिनेश वाघमारे, विधी समिती सभापती मंदा आल्हाट, शहर सुधारणा समिती सभापती
प्रतिभा भालेराव, महिला व बाल कल्याण समिती सभापती अनूराधा गोफणे, क्रीडा, कला, साहित्य व
सांस्कृतिक समिती सभापती समीर मासुळकर, शिक्षण मंडळ सभापती निवृत्ती शिंदे, जैव विविधता
व्यवस्थापन समिती अध्यक्ष मोरेश्वर भोंडवे, अ प्रभाग अध्यक्ष निलेश पांढरकर, ब प्रभाग अध्यक्षा
आशा सुर्यवंशी, क प्रभाग अध्यक्षा शैलजा शितोळे, ड प्रभाग अध्यक्ष अरूण टाक, फ प्रभाग अध्यक्षा
मंदाकिनी ठाकरे, शिवसेना व आर.पी.आय. महायुती (आघाडी) च्या गटनेत्या सुलभा उबाळे, मनसे
गटनेते अनंत को-हाळे, भाजप गटनेत्या वर्षा मडिगेरी, माजी महापौर आर.एस.कुमार, योगेश बहल,
अपर्णा डोके, मोहिनी लांडे, नगरसदस्य संजय काटे, ॲड. संदिप चिंचवडे, निलेश बारणे, बापु उर्फ
शञुघ्न काटे, अतुल शितोळे, प्रशांत शितोळे, नगरसदस्या अश्विनी चिंचवडे, चंद्रकांता सोनकांबळे,
झामाबाई बारणे, सुजाता पालांडे, वैशाली काळभोर, सुजाता टेकवडे, भारती फरांदे, शितल काटे, सुषमा
तनपुरे, सोनाली जम, अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे सह आयुक्त दिलीप गावडे यांच्यासह सर्व
सन्मानीय नगरसदस्य, नगरसदस्या आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
मंगळवार, दिनांक. ०३ जानेवारी २०१७ रोजी सकाळी ९.३० वाजता प्रभाग क्र. ६४ दापोडी
येथील सी.एम.ई गेटसमोर मुंबई पुणे रस्ता सब वे चे भूमीपूजन तर सकाळी १०.३० वाजता प्रभाग क्र.
५० श्रीनाथ सोसायटी जवळ थेरगांव गावठाण रस्त्यावर आर. सी. सी कमानीचे भूमीपूजन तसेच
सकाळी ११.०० वाजता प्रभाग क्र. २२ मोरया गोसावी मंदिराजवळ चिंचवड गावठाण येथील जिजाऊ
पर्यटन केंद्राचे उदघाटन करण्यात येईल.
दुपारी १२.०० वाजता प्रभाग क्र. ३९ संत तुकाराम नगर- छञपती शिवाजी चौक, महेश नगर
चौकातील संस्कार शिल्पाचे उद्धाटन तर दुपारी १२.१० वाजता संत तुकाराम नगर येथील डॉ.
बाबासाहेब आंबेडकर चौकातील बेटी बचाओ शिल्पाचे उद्घाटन, दुपारी १२.२० वाजता संत तुकाराम
नगर येथील बहुउद्देशीय इमारतीचे भूमीपूजन तसेच दुपारी १२.३० वाजता प्रभाग क्र. ३९ वल्लभनगर
एस.टी स्टॅंडसमोर राष्ट्रीय फेरीवाला धोरणांतर्गत पिंपरी चिंचवड शहरातील पाञ फेरीवाल्यांना
प्रमाणपञ वाटप करण्यात येईल.
दुपारी १.०० वाजता प्रभाग क्र. २८ मासुळकर कॉलणीतील उद्यमनगर येथील स.नं. १०४ येथे
विकसीत करण्यात येणा-या उद्यानाचे भूमीपूजन तर दुपारी १.२० वाजता प्रभाग क्र. २६ काळभोरनगर
– मोहननगर येथील ई.एस.आय हॉस्पिटल चौकातील गाय वासरू शिल्पाचे अनावरण तसेच दुपारी
२.०० वाजता प्रभाग क्र. १६ आकुर्डी येथील जय गणेश व्हिजन शेजारील आरक्षण क्र. १७१ क्रीडांगण
व उद्यानाचे भूमीपूजन करण्यात येईल.
सायंकाळी ४.०० वाजता प्रभाग क्र. १४ येथील भक्ती शक्ती उद्यानात उभारण्यात येणा-या
१०७ मीटर उंचीच्या राष्ट्रीय ध्वज उभारणीच्या कामाचे भूमीपूजन तर सायंकाळी ५.०० वाजता प्रभाग
क्र. ५५ पिंपळे सौदागर येथील रोजलँड रेसिडेन्सी जवळील उद्यानाच्या कामाचे भूमीपूजन तसेच
सायंकाळी ६.०० वाजता प्रभाग क्र. ५९ सांगवी येथील मधुबन सोसायटी मधील अंतर्गत रस्ते व सिमेंट
रोड कामाचे भूमीपूजन व सायंकाळी ६.३० वाजता प्रभाग क्र. ६० सांगवी येथील स्व. तानाजीराव
शितोळे (सरकार) शिवसृष्टी उद्यानातील ध्यानधारणा केंद्राचे लोकार्पण माजी उपमुख्यमंत्री अजितदादा
पवार यांच्या हस्ते होणार असून या ठिकाणी जाहिर सभेने कार्यक्रमाची सांगता होणार आहे.