दिनांक : ०३ जानेवारी २०१७ – पिंपरी चिंचवड शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कटिबध्द असल्याचे मत माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी व्यक्त केले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरात विविध विकास प्रकल्पांचे भूमीपूजन व उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
महापौर शकुंतला धराडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास खासदार श्रीरंग उर्फ आप्पा बारणे, माजी आमदार विलास लांडे, अण्णा बनसोडे, उपमहापौर प्रभाकर वाघेरे, स्थायी समिती सभापती हिरानंद ऊर्फ डब्बू आसवाणी, सत्तारुढ पक्षनेत्या मंगलाताई कदम, शहर सुधारणा समिती सभापती प्रतिभा भालेराव, महिला व बाल कल्याण समिती सभापती अनूराधा गोफणे, क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती सभापती समीर मासुळकर, शिक्षण मंडळ सभापती निवृत्ती शिंदे, जैव विविधता व्यवस्थापन समिती अध्यक्ष मोरेश्वर भोंडवे, अ प्रभाग अध्यक्ष निलेश पांढरकर, ब प्रभाग अध्यक्षा आशा सुर्यवंशी, ड प्रभाग अध्यक्ष अरूण टाक, फ प्रभाग अध्यक्षा मंदाकिनी ठाकरे, मनसे गटनेते अनंत को-हाळे, माजी महापौर आझम पानसरे, संजोग वाघेरे, योगेश बहल, अपर्णा डोके, नगरसदस्य राजेंद्र काटे, संजय काटे, निलेश बारणे, अतुल शितोळे, प्रसाद शेट्टी, ॲड. संदिप चिंचवडे, निलेश बारणे, नगरसदस्या रमा ओव्हाळ, अश्विनी चिंचवडे, चंद्रकांता सोनकांबळे, भारती फरांदे, शितल काटे, सुषमा तनपुरे, सोनाली जम, झामाबाई बारणे, सुजाता पालांडे, वैशाली काळभोर, सुजाता टेकवडे, अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे यांच्यासह सर्व सन्मानीय नगरसदस्य, नगरसदस्या आदी मान्यवर उपस्थित होते.
सकाळी ९.३० वाजता प्रभाग क्र. ६४ दापोडी येथील सी.एम.ई गेटसमोर मुंबई पुणे रस्ता सब वे चे भूमीपूजन त्यांच्या हस्ते झाले. यावेळी नगरसदस्या चंद्रकांता सोनकांबळे, रमा ओव्हाळ, नगरसदस्य संजय काटे, राजेंद्र काटे आदि मान्यवर उपस्थित होते. तर सकाळी १०.३० वाजता प्रभाग क्र. ५० श्रीनाथ सोसायटी जवळ थेरगांव गावठाण रस्त्यावर आर. सी. सी कमानीचे भूमीपूजन त्यांच्या हस्ते झाले यावेळी खासदार श्रीरंग उर्फ आप्पा बारणे, जैव विविधता व्यवस्थापन समिती अध्यक्ष मोरेश्वर भोंडवे, नगरसदस्या झामाबाई बारणे, नगरसदस्य निलेश बारणे, कैलास थोपटे, संपत पवार, माजी नगरसदस्य सिध्देश्वर बारणे, सतीश दरेकर, गणेश भोंडवे, राजेंद्र साळुंके, शहर अभियंता अंबादास चव्हाण, सहाय्यक आयुक्त मनोज लोणकर, आशादेवी दुरगुडे, कार्यकारी अभियंता देवण्णा गट्टूवार आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच सकाळी ११.०० वाजता प्रभाग क्र. २२ मोरया गोसावी मंदिराजवळ चिंचवड गावठाण येथील जिजाऊ पर्यटन केंद्राचे उदघाटन त्यांच्या हस्ते झाले. यावेळी खासदार श्रीरंग उर्फ आप्पा बारणे माजी आमदार अण्णा बनसोडे, ब प्रभाग अध्यक्षा आशा सुर्यवंशी, नगरसदस्या शमीम पठाण, अश्विनी चिंचवडे, छाया साबळे, नगरसदस्य हनुमंत गावडे, ॲड. संदिप चिंचवडे, निलेश बारणे, संपत पवार, नारायण बहिरवाडे, माजी नगरसदस्य जगन्नाथ साबळे, नाना काटे, गजानन चिंचवडे, उत्तम हिरवे, हरिभाऊ तिकोणे, स्विकृत प्रभाग सदस्य शरद लुनावत, माजी शिक्षणमंडळ सदस्य श्रीधर वाल्हेकर, शहर अभियंता अंबादास चव्हाण, कार्यकारी अभियंता देवण्णा गट्टूवार, सामाजित कार्यकर्ते हमीद शेख, मानव कांबळे, धनाजी विनोदे आदी मान्यवर उपस्थित होते.
दुपारी १२.०० वाजता प्रभाग क्र. ३९ संत तुकाराम नगर – छञपती शिवाजी चौक, महेश नगर चौकातील संस्कार शिल्पाचे उद्धाटन तर दुपारी १२.१० वाजता संत तुकाराम नगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील बेटी बचाओ शिल्पाचे उद्घाटन, दुपारी १२.२० वाजता संत तुकाराम नगर येथील बहुउद्देशीय इमारतीचे भूमीपूजन तसेच दुपारी १२.३० वाजता प्रभाग क्र. ३९ वल्लभनगर एस.टी स्टॅंडसमोर राष्ट्रीय फेरीवाला धोरणांतर्गत पिंपरी चिंचवड शहरातील पाञ फेरीवाल्यांना प्रमाणपञ वाटप माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमांस शिक्षण मंडळ सभापती निवृत्ती शिंदे, माजी महापौर आझम पानसरे, योगेश बहल, वैशाली घोडेकर, नगरसदस्या सुजाता पालांडे, अमिना पानसरे, गीता मंचरकर, साधना जाधव, आशा सुपे, नगरसदस्य वसंत लोंढे, हनुमंत गावडे, नारायण बहिरवाडे, माजी शिक्षण मंडळ सभापती फजल शेख, विजय लोखंडे, माजी नगरसदस्य जगदीश शेट्टी, नाना काटे, बबनराव गाढवे, मायला खञी किसनराव नेटके, माजी नगरसदस्या सुरेखा लांडगे, विश्रांती पाडाळे, कमरुन्नीसा खान, लता ओव्हाळ सामाजिक कार्यकर्ते अशोक शिलवंत, ज्ञानेश्वर कांबळे, बाबा कांबळे, तुकाराम पडवळ, प्रभाकर कोळी आदी मान्यवर उपस्थित होते.
दुपारी १.०० वाजता प्रभाग क्र. २८ मासुळकर कॉलनीतील उद्यमनगर येथील स.नं. १०४ येथे विकसीत करण्यात येणा-या उद्यानाचे भूमीपूजन त्यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमास माजी आमदार विलास लांडे, क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती सभापती समीर मासुळकर, नगरसदस्या मंदाकिनी ठाकरे, माजी महापौर वैशाली घोडेकर, माजी शिक्षणमंडळ सभापती अर्जुन ठाकरे, फजल शेख, नगरसदस्या सविता साळुंके, गीता मंचरकर, माजी नगरसदस्य काका लांडे, जगदीश शेट्टी, मनोज खानोलकर आदी मान्यवर उपस्थित होते.
दुपारी १.२० वाजता प्रभाग क्र. २६ काळभोरनगर – मोहननगर येथील ई.एस.आय हॉस्पिटल चौकातील गाय वासरू शिल्पाचे अनावरण त्यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमास माजी आमदार विलास लांडे, अण्णा बनसोडे, अ प्रभाग अध्यक्ष निलेश पांढारकर, नगरसदस्य नारायण बहिरवाडे, प्रसाद शेट्टी, जावेद शेख, तानाजी खाडे, नगरसदस्या वैशाली काळभोर, सुजाता टेकवडे, माजी शिक्षणमंडळ सभापती फजल शेख, माजी नगरसदस्य रामचंद्र माने, शरद बो-हाडे, उत्तम हिरवे, सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब आडागळे, संजय जगताप, आशिष रॉय आदी मान्यवर उपस्थित होते.
दुपारी २.०० वाजता प्रभाग क्र. १६ आकुर्डी येथील जय गणेश व्हिजन शेजारील आरक्षण क्र. १७१ क्रीडांगण व उद्यानाचे भूमीपूजन त्यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमास शहर सुधारणा समिती सभापती प्रतिभा भालेराव, अ प्रभाग अध्यक्ष निलेश पांढारकर, ड प्रभाग अध्यक्ष अरुण टाक, नगरसदस्या नंदा ताकवणे, वैशाली काळभोर, नगरसदस्य राजू मिसाळ, माजी स्थायी समिती सभापती ज्ञानेश्वर भालेराव, माजी नगरसदस्य मनोज खानोलकर आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमांवेळी अजितदादा पवार म्हणाले, पिंपरी चिंचवड हे शहर आपल्या सर्वांचे आहे. शहराचा विकास व दर्जा चांगला ठेवण्यासाठी जनतेने सहकार्य करावे. महात्मा फुलेंनी लावलेल्या ज्ञानाच्या दिव्यातील तेलाची भूमिका ज्ञानज्योती साविञीबाई फुले यांनी केली आहे. समाज सुधारणेचे काम त्यावेळच्या प्रतिकुल परिस्थिती मध्ये ही साविञीबाई फुलेंनी केले. साविञीबाई फुले यांचा शिक्षणाचा वसा पुढे नेवून कोणालाही शिक्षणापासून वंचित ठेवता कामा नये. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष न तोडता नवीन वृक्ष लावावे. मैदाने, उद्याने, जलतरण तलाव आदी महापालिकेने विकसित केलेल्या प्रकल्पांचे जतन करावे. शहरातून जाणारी नदी स्वच्छ सुंदर ठेवली पाहिजे त्यामध्ये घाणीचे साम्राज्य होता कामा नये. पर्यटन स्थळेही स्वच्छ ठेवली पाहिजेत. शहर झोपडपट्टी मुक्त करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. कष्टक-यांची, कामगारांची असलेली पिंपरी चिंचवड ही नगरी अधिक सोयीयुक्त बनविण्यासाठी आम्ही कटीबध्द असून त्यास जनतेचे सहकार्य मिळणे गरजेचे आहे.
शहरातील वेगवेगळ्या भागात हॉकर्स झोन असायला हवेत. लोकांना ञास न होता हॉकर्स झोन मध्ये हॉकर्सना उत्पन्न मिळाले पाहिजे. मुलींचे जन्मप्रमाण वाढले पाहिजे. बेटी बचावासाठी जनतेने कार्य केले पाहिजे. आई-वडीलांना खरं प्रेम मुलींनकडूनचं मिळतं. या शहरात कुणाला ही अनादराची वागणूक मिळता कामा नये. हे शहर झोपडपट्टी विरहित करण्यासाठी आम्ही प्रयत्नशिल असून आपणां सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. शहरामध्ये सर्वांत मोठा राष्ट्रध्वज फडकणार असून यामुळे शहराची उंची वाढणार आहे. देशातील विविध महापालिकेचे पदाधिकारी, नगरसदस्य, अधिकारी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विकास कामांना भेटी देवून जात आहेत. वायसीएमएच हे महाराष्ट्रातले नावाजलेले हॉस्पीटल असून येथे गरिबांसाठी व सर्व सामान्यांसाठी वैद्यकिय सेवा पुरविली जात आहे. शहरात २४ x ७ पाणीपुरवठा करण्याचे काम हाती घेतले आहे. सारथी या प्रकल्पाला गती देण्याचे काम सुरु असून सामान्य जनतेच्या तक्रार निवारणाचे काम महापालिकेच्या माध्यमातून केले जात आहे. शहरात सर्व जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहत असून त्यांना सेवा सुविधा पुरविण्याचे काम महापालिकेच्या माध्यमातून करण्यात येत आहे. संपुर्ण शहरात एल.ई.डी. दिवे बसवून विजेची बचत करण्यात येत आहे. महापालिकेतील सर्व कामे ई टेडरिंग द्वारे करण्यात येत आहे.
पिंपरी चिंचवड शहराची ओळख उभ्या भारतात राहिली पाहिजे असे काम पदाधिकारी व अधिकारी यांनी केले पाहिजे, ज्ञान व गुणवत्तेने माणूस मोठा होतो तेव्हा सर्वांनी ज्ञान व गुणवत्ता प्राप्त करावी असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे सुञसंचालन क्षेञीय अधिकारी अण्णा बोदडे यांनी केले.