पिंपरी, दि. ०७ जानेवारी २०१७ – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने प्रभाग क्र. ११ सेक्टर नंबर २२ मध्ये विविध नामफलकाचे उद्घाटन शिवसेना व आरपीआय महायुती आघाडीच्या गटनेत्या सुलभा उबाळे यांच्या हस्ते झाले. यावेळी नगरसदस्या संगीता पवार उपस्थित होत्या. या कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते शिवाजी साळवे, शशिकला उभे, स्मिता मोगरे, नजमा शेख, संगिता पुरी, गणेश धननायक, स्थापत्य अभियांञिकी सहाय्यक अनिल जांभळे, माहिती व जनसंपर्कचे किशोर केदारी, अशोक चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी स्पाईन रस्त्याच्या लगत असणारे उद्यानाला “स्वर्गीय हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे उद्यान” असे नामकरण, संजय नगर मधील समाज मंदिरास “कै. साविञीबाई फुले समाजमंदिर” असे नामकरण, राजनगर (सी क्लस्टर) “बालाजी समाज मंदीर” असे नामकरण, इंदिरानगर (ए क्लस्टर) “स्व.इंदिरा गांधी समाज मंदीर” असे नामकरण, मिलिंद नगर विकास मंदिरास “मरिआई माता मंदिर” असे नामकरण आदी कार्यक्रम संपन्न झाले. कार्यक्रमांचे सुञसंचालन किशोर केदारी यांनी केले.