साक्री : विद्यार्थ्यांनी  संचलन, मशाल प्रज्वलन व परेड  करून प्रचिती इंटरनॅशनल स्कुलमध्ये क्रीडा खेळपट्टीचे पूजन करून वार्षिक क्रीडा सोहळा साजरा केला.

प्रचिती इंटरनॅशनल स्कुल, साक्री येथे संस्थेचे अध्यक्ष प्रशांत भीमराव पाटील, प्राचार्य अतुल देव, व्यवस्थापक  तुषार देवरे  यांच्या मार्गदर्शनाने  वार्षिक क्रीडा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साक्री तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी बी.बी. भिल, प्रमुख पाहुणे साक्री तालुका क्रीडा स्पर्धा संयोजक  महेश मराठे उपस्थित होते. तसेच शिक्षण विस्तार अधिकारी शालीग्राम बच्छाव, विजय पवार, शिक्षक पालक संघ उपाध्यक्ष विपीन पवार, रवि खैरणार व शाळेचे व्यवस्थापक वैभव सोनवणे आदी उपस्थित होते.

वार्षिक़ क्रीडा सोहळ्यात विद्यार्थ्यांनी सादर केलेले संचलन, मशाल प्रज्वलन व परेड या सर्व गोष्टी प्रचिती इंटरनॅशनल स्कुल मध्ये ऑलम्पिक स्पर्धा होत आहेत का? व भविष्यात या शाळेतून ऑलम्पिक

स्पर्धेत सहभागी होऊ शकतील असे स्पर्धक या विद्यार्थ्यांमधून घडतील असा विश्वास संयोजक महेश मराठे यांनी व्यक्त केला. या वेळी गटशिक्षणाधिकारी बी.बी. भिल यांनी शिक्षण विभागातर्फे विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

शाळेचे मल्लखांब प्रशिक्षक नितीन राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी प्रात्याशिके सादर केली.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका सबिता अलेक्स यांनी केले. संयोजनात  क्रीडाशिक्षक कुणाल देवरे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहभाग घेतला.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here