पिंपळनेर : येथील पिंपळनेर एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष कर्मवीर कै.आनंदराव माणिकराव पाटील उर्फ बंडू बापूजी यांच्या पुण्यतिथिनिमित्त दि. 9 ते 11 जानेवारीला राज्यस्तरीय पोवाडा गायन स्पर्धा व वादविवाद स्पर्धा होणार आहे.

कार्यक्रमात अध्यक्षस्थानी शालेय समितीचे अध्यक्ष आत्माराम बिरारीस असतील. उद्घाटन उमविचे माजी सदस्य दिलीप पाटील यांच्या हस्ते होईल. प्रमुख पाहुणे म्हणून माजी प्राचार्य जी.आर.भावसार राहतील. पोवाडा गायन स्पर्धा दि.9 जानेवारीला सकाळी 9.15 वाजता सुरू होईल. दि. 10 जानेवारीला जागतिक पातळीवरील दहशतवादावर युद्ध हा उपाय आहे. या विषयावर वादविवाद स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत स्पर्धकांना अनुकूल व प्रतिकूल बाजू 10 मिनिटात मांडायची आहे. विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन दि.11 जानेवारीला उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. के. पी. तुपे यांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. सकाळी 10 वाजता राष्ट्रीय प्रबोधनकार प्रा. गणोश पाटील यांचे ‘माँ तुझे सलाम’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. पोवाडा गायन स्पर्धेसाठी एका महाविद्यालयातून एक संघ व वादविवाद स्पर्धेसाठी दोन विद्यार्थाचा एक संघ पाठवावा. या स्पर्धेत कनिष्ठ, वरिष्ठ व अध्यापक महाविद्यालयातील मुला, मुलींनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन संचालक मंडळ, संयोजन समिती व प्राचार्य दाभाडे यांनी केले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here