पिंपरी (दि. 11 जानेवारी 2017) संगणकशास्त्र आणि तंत्रज्ञानातून मेकॅट्रॉनिक्सची निर्मिती झाली. या शाखेच्या माध्यमातून विकसित झालेल्या तंत्रज्ञानाच्या वापरासाठी विज्ञान, गणित आणि अभियांत्रिकी शाखेचे ज्ञान आवश्यक आहे. पुर्वी गणित सुत्रांसाठी कॅलक्युलेटर वापरले जायचे परंतू संगणकामुळे त्याचे अस्तित्वं संपुष्टात आले. तसेच नविन तंत्रज्ञानामुळे अभियांत्रिकीच्या अनेक शाखांचे एकत्रिकरण होऊन ‘मेकॅट्रॉनिक्स’ शास्त्र शाखा उदयास येत आहे. याचा वापर अभियंत्यांनी करावा. असे मार्गदर्शन पाषाण येथिल एआरडीई डीआरडीओचे संयुक्त संचालक मेजर जनरल डी. कपिल यांनी केले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या रावेत येथिल पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘रिसेंट ट्रेड इन मेकॅट्रॉनिक्स’ या विषयावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने अभियांत्रिकी विद्यार्थी आणि प्राध्यापकांसाठी दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. अमित कुमार शर्मा, ट्रस्टचे अध्यक्ष माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव व्हि.एस. काळभोर, खजिनदार एस. डी. गराडे, विश्वस्त भाईजान काझी, कार्यकारी संचालक डॉ. गिरीष देसाई, प्रा. विरेंद्र कुमार, डॉ. पी.जे. अवसरे, डॉ. सचिन मस्तुद, डॉ. सुहास देशमुख, प्राचार्य डॉ. हरिष तिवारी, प्रा. व्ही.के. आहेर, डॉ. एस्.एस्. ओहोळ आदी उपस्थित होते.
डॉ. अमित शर्मा मार्गदर्शन करताना म्हणाले की, अभियंता होऊ इच्छिणा-या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या शाखेव्यतिरिक्त इतर अभियंता शाखेचा देखिल अभ्यास करावा. कृषी वाहन उद्योग आणि अपारंपरिक उर्जाक्षेत्रामध्ये मेकॅट्रॉनिक्सची खूप मागणी असल्यामुळे या क्षेत्रात आगामी काळात लाखो अभियंत्यांना संशोधन आणि रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. अनेक शाखांच्या एकत्रिकरणातून कमी उत्पादन खर्चात आणि कमी मन्युष्यबळात जास्त उपयोगी नवनिर्मिती होऊ शकते. असे मार्गदर्शन डॉ. अमित कुमार शर्मा यांनी केले.
या कार्यशाळेच्या आयोजनात प्रा. एस्. एस्. वेळे, प्रा. व्ही.एस् कुंभार, प्रा. स्नेहा पावडे, प्रा. गणेश फोडसे, प्रा. दिपक बिरादर, यांनी सहभाग घेतला.