पिंपरी, दि. १८ जानेवारी २०१७ – पिंपरी चिंचवड महानगरपालिका, सार्वत्रिक निवडणूक २०१७ साठी आदर्श आचारसंहिता दि. ११ जानेवारी २०१७ पासून राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार लागूकरण्यात आलेली असून. दि. ११/०१/२०१७ दुपारी ते दि. १६/०१/२१०७ अखेर राजकीय पक्षाशी संबंधित सर्व प्रकारचे फ्लेक्स, बॅनर्स, कटाऊट, जाहिराती, भिंत्तीपत्र, कॅलेंडर्स, फोटो, बोर्ड व राजकीय पक्षांचे झेंडे सर्व मिळून एकूण ९ ,३५० काढून घेण्याची कारवाई करण्यात आल्याचे निवडणूक विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. यशवंत माने यांनी सांगितले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत १२४६, ब क्षेत्रीय कार्यालयांतर्गत २०९१, क क्षेत्रीय कार्यालयांतर्गत ८१७, ड क्षेत्रीय कार्यालयांतर्गत १९७६, इ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत १६८०, फ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत १५४० असे एकूण ९,३५० फ्लेक्स, बॅनर्स व झेंडे काढून घेण्याची कारवाई करण्यात आली आहे.