पिंपरी, दि. १८ जानेवारी २०१७- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या फेब्रुवारी २०१७ मध्ये होणा-या सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी शहरात जनजागृती मोहीम राबविण्यात येत असून त्याअंतर्गत शहरातील सर्व गणेशोत्सव मंडळे व रिक्षा संघटनाच्या पदाधिका-यांची बैठक शुक्रवार, दि.२० जानेवारी २०१७ रोजी सकाळी ११.०० वाजता पिंपरी येथील मेघाजी लोखंडे कामगार भवन येथे आयोजित करण्यात आली असून त्यामध्ये मंडळाच्या पदाधिका-यांनी उपस्थित राहावे असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. दिनांक २१ फेब्रुवारी २०१७ रोजी महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. लोकशाहीने प्रत्येक मतदाराला मतदानाचा हक्क दिला असून तो हक्क प्रत्येकाने बजवावा त्यासाठी मतदार जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. त्यांतर्गत विविध स्वंयसेवी संस्था, संघटना, गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिका- यांची बैठक घेऊन त्यांनी या मोहिमेमध्ये सहभागी होऊन मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here