पिंपरी, दि. १८ जानेवारी २०१७- अरुणाचल प्रदेश सरकारचे वरिष्ठ नगररचनाकार सुखविंदर सिंग यांनी बुधवार, दि.१८ जानेवारी २०१७ रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विविध विभागांना तसेच विकास प्रकल्पांना भेट दिली. यावेळी त्यांचे स्वागत आयुक्त दिनेश वाघमारे व सह.आयुक्त दिलीप गावडे यांनी केले. या अभ्यास दौ-यामध्ये सुखविंदर सिंग, सरंजित कौर यांना ई-गव्हर्नर्स, कर आकारणी व कर संकलन विभाग तसेच बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग यांच्या कार्यप्रणाली बाबत सह.आयुक्त दिलीप गावडे, कार्यकारी अभियंता प्रशांत पाटील तसेच माहिती तंत्रज्ञान विभागाचे सुधीर बोराडे यांनी चित्रफितीद्वारे सविस्तर माहिती दिली.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा कारभार सुनियंत्रित व शिस्तबद्द पद्धतीचा असून येथील कार्यप्रणालीचा अवलंब अरुणाचल प्रदेशामधील महानगरपालिकेत राबविला जाणार असल्याचे मत यावेळी सुखविंदर सिंग यांनी व्यक्त केले.