पिंपरी, दि. १९ जानेवारी २०१७ – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कामकाजाची व राबवित असलेल्या विविध विकास प्रकल्पांची माहिती जाणून घेण्यासाठी आलेल्या आसाम, मेघालय व मिझोरम राज्यातील शासकीय अधिका-यांच्या शिष्टमंडळाचे स्वागत कार्यकारी अभियंता प्रविण लडकत यांच्याहस्ते करण्यात आले. शिष्टमंडळाने मोशी येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प तसेच निगडी येथील जलशुद्धीकरण केंद्रातील स्काडा प्रणालीची प्रत्यक्ष भेट देवून तेथील माहिती जाणून घेतली. या अभ्यास दौरा पथकामध्ये आसाम राज्यातील सहसचिव पॉल बरुआ, पुष्पांजली दास, गीतांजली दत्ता, दिपक कुमार हॅण्डीक्यु, पुरबी कोनवर, मुख्य कार्यकारी अधिकारी कृष्णा बरुआ, लखीनंदन गोगोई, धिरेन हजरीका, मेहमुद हसन तसेच मेघालय राज्यातील अतिरीक्त सहाय्यक आयुक्त बनतेलंग खारशांदी व मिझोरोम राज्यातील प्रकल्प निदेशक नुनहलव्हा, व्ही.ललेग्मंविया यांचा समावेश होता. या अभ्यास दौरा शिष्टमंडळाचे नेतृत्व यशदा येथील प्रशिक्षण निदेशक सदाशिव पाटील यांनी केले.