धुळे : प्रलंबित मागण्यांसाठी आज महापालिकेच्या कर्मचार्यांनी महापालिकेच्या आवारात निदर्शने करुन उद्यापासून कामबंद आंदोलनाचा इशारा दिला आहे.
महापालिकेच्या कर्मचार्यांना पाचव्या व सहाव्या वेतन आयोगाचा फरक मिळावा, रोजंदारीत वाढ करावी व इतर प्रलंबित मागण्या मान्य होत नसल्यामुळे आज कर्मचार्यांनी महापालिकेच्या आवारात निदर्शने केली.
या आंदोलनात प्रसाद जाधव, सुनील सानप, देवा मोरे, सुनील गढरी, शशी मराठे, संजय आगलावे, विशाल निंबाळकर, राजू मराठे, आर.बी.सोनवणे, जामील अन्सारी आदींसह अन्य कर्मचारी सहभागी झाले होते.
मागण्या २० जानेवारीपर्यंत पूर्ण न झाल्यास २१ जानेवारीपासून कामबंद आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला.