पिंपरी :– वाकड येथील महावितरण कार्यालयाला  महावितरण विभागाच्या कार्यक्षमतेचा निषेध करत उद्या (दि.२७ शुक्रवारी) टाळे ठोकणार असल्याचे नगरसेवक सचिन भोसले यांनी सांगितले आहे. सचिन भोसले यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात असे म्हटले आहे की, प्रभाग क्रमांक २३ व २४ या संपूर्ण परिसरामध्ये गेल्या अनेक दिवसापासून वीजपुरवठा सतत खंडित होत असल्याने नागरिकांच्या घरातील इलेक्ट्रॉनिक्स वस्तू मध्ये बिघाड होत आहे. तसेच प्रभागातील रोहित्र मिनी डीपी बॉक्सचे दरवाजे देखील उघडे पडल्याने अपघात होण्याची शक्यता आहे. रोहित्र व डीपीमध्ये वेली व झाडांच्या फांद्यांचे जाळे विणलेली आहे. या सर्व समस्याने नागरिक त्रस्त होऊन वारंवार लोकप्रतिनिधींकडे तक्रार करत असतात. तसेच प्रभागातील अनेक ठिकाणी विजेच्या केबल जुन्या झाल्या आहेत. याबाबत पत्राद्वारे महावितरण विभागाला नगरसेवक सचिन भोसले यांनी वारंवार आणून दिले. तरी देखील जाणीवपूर्वक या तक्रारींकडे महावितरण विभाग दुर्लक्ष करीत आहे. तसेच याबाबत अनेकदा पत्राद्वारे महावितरण विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली असून वेळोवेळी निवेदने व अर्ज केलेत. तरीही महावितरणचे अधिकारी  कर्मचारी काहीच कार्यवाही करीत नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळेच नागरिकांच्या समस्या दिवसेंदिवस वाढतच आहेत, नागरिक त्रस्त झाले आहेत. शुक्रवार दि.२७ सप्टेंबर रोजी महावितरण विभागाच्या अकार्यक्षमतेचा निषेध करत ताथवडे विभागातील वाकड मधील महावितरण कार्यालयाला आपण टाळे ठोकणार असल्याचे भोसले यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here