पिंपरी चिंचवड – प्लास्टिक वापरामुळे व विल्हेवाटीमुळे विविध प्रकारच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. या विषयास अनुसरुन महापालिकेमध्ये महाराष्ट्र अविघटनशील कचरा (नियंत्रण) कायदा, २०१६ व प्लास्टिक व थर्माकॉल, अविघटनशील वस्तूंचे (उत्पादन, वापर, विक्री, वाहतूक, हाताळणी, साठवणूक) अधिसूचना २०१८ नियमांचे अधिन राहून परिणामकारक अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. शहरात एकदाच वापरल्या जाणाऱ्या ताट, वाटी चमचे, भांडी, कप ग्लास, स्ट्रॉ, प्लास्किच्या वस्तु हॉटेल्समधून अन्नपदार्थाच्या पॅकेजींगसाठी वापरले जाणारे लहान मोठे कंटेनर्स, सर्व प्रकारच्या प्लास्टिक बॅग्ज इ. वर बंदी आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या २ ऑक्टोंबर २०१९ रोजी १५० व्या जयंतीच्या  निमित्त स्वच्छता हि सेवा अभियान राबविण्यात येणार आहे.

शाळांमध्ये प्लास्टीक बंदीबाबत स्वच्छता शपथ, चित्रकला स्पर्धा, पथ नाटय,  वक्तृत्व स्पर्धा, रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली. सर्व क्षेत्रीय कार्यालयातील शाळांमध्ये रॅलीमार्फत स्वच्छता  ही सेवा व प्लास्टीक बंदीबाबत जनजागृती करण्यात आली. पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्लास्टीक बंदी जनजागृती, श्रमदान व प्लास्टीक मुक्त दिवाळी उपक्रमाद्वारे केंद्र शासनाच्या निर्देशनानुसार शहरात ११ सप्टेंबर ते २७ ऑक्टोंबर २०१९ दरम्यान स्वच्छता हि सेवा मोहिम- प्लास्टीक बंदीबाबत जनजागृती, श्रमदानातुन प्लास्टीक संकलन मोहिम व रिसायकलिंग अथवा प्लास्टीक मुक्त दिवाळी या  तीन टप्प्यामध्ये राबविण्याचे निश्चित करण्यात आले आहे. २ ऑक्टोंबर २०१९ रोजी संकलन मोहिम राबविण्यात येणार आहे. तरी नागरीक, संघटना, संस्था, शाळा,क्रिडा संकुल, क्लब्स, चित्रपट व नाटयगृहे, औदयोगिक संस्था, हॉल, शासकीय/ निमशासकीय/ खाजगी कार्यालये, धार्मिक संस्था, हॉटेल, दुकानदार, मॉल्स, विक्रेता, केटरर्स, व्यापारी, फेरीवाला, वितरक, वाहतूकदार, सेल्समन, मंडई, उत्पादकांना आवाहन करण्यात येत आहे.  बंदी घालण्यात आलेल्या प्लास्टीक व थर्माकॉल इ. वस्तु, पेट बाटल्या यांचे २ ऑक्टोंबर २०१९ रोजी सकाळी ९ ते दुपारी  ४ वाजेपर्यंत संकलन केंद्रात जमा करण्यात याव्यात. क्षेत्रीय कार्यालयामध्ये प्रपत्र अ मध्ये नमुद केलेल्या संकलन केंद्रात नागरिकांना प्लास्टीक जमा करावे, प्लास्टीक ऐवजी कापडी पिशवीचा वापर करण्याबाबत महापालिकेकडून आवाहन करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here