पिंपरी | पिंपरी-चिंचवड शहरात दहशत माजवण्यासाठी रावण टोळी या नावाने प्रसिद्ध असलेल्या टोळीतील जवळपास 13 गुन्हेगारांवर यापूर्वी पोलिसांनी कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. आता या टोळीतील 2 सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. या गुन्हेगारांसह गावठी रिव्हॉल्व्हर आणि 3 जिवंत काडतुसे पोलिसांनी जप्त केली आहेत.

पोलीस आयुक्तालयात नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत पोलिसांना सण-उत्सव आणि निवडणूक काळात सतर्क राहून गुन्हेगारांवर करडी नजर ठेवण्याच्या सूचना पोलीस आयुक्त संदीप बिश्नोई यांनी सर्व पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्या अनुषंघाने पोलिसांनी सापळा रचत रावण टोळीतील सक्रिय सदस्य प्रसन्ना पवार याला देहूरोड इथल्या अमराई मंदिरातून ताब्यात घेत त्यांची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून एक गावठी रिव्हॉल्व्हर तसेच एक जिवंत काडतूस आढळून आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here