चिंचव आयईईई उपक्रमांतर्गत डॉ. डि. वाय पाटील इन्स्टिटयूट ऑफ इंजिनिअरींग, मॅनेजमेंट अँड रिसर्च, आकुर्डीमध्ये सर्व विद्यार्थी व शिक्षकांसाठी ई-कचरा व्यवस्थापन कार्यक्रम घेण्यात आला. इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलीकम्युनिकेशन विभागामार्फत हा कार्यक्रम संस्थेच्या पातळीवर घेण्यात आला.

क्विन्स टाऊन सोसायटी चिंचवड, सोनीगरा रेसिडेन्सी पिंपरी, दयाल हाइट्स रहाटणी व इतर ठिकाणांहून अंदाजे ५० किलो पेक्षा जास्त ई-कचरा गोळा झाला.  ई-कचरा संपूर्ण संकलनानंतर विभागाने ई-कचरा व्यवस्थापन कंपनीला देण्यात आला. अशा उपक्रमांमुळे आपण ई-कचरा जो सहजपणे पुनर्संचयित करून त्यांची पुनर्प्रक्रिया करू शकतो. या उपक्रमासाठी इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन विभाग प्रमुख प्रा. प्रिया चार्ल्स, प्रा. संध्या शिंदे  व विद्यार्थ्यानी विशेष परिश्रम घेतले.  तसेच  ह्या उपक्रमाबद्धल संस्थेचे चेअरमन आमदार सतेज पाटील, डॉ. डी. वाय. पाटील शैक्षणिक संकुलाचे संचालक (निवृत्त) कर्नल एस. के. जोशी, प्राचार्यां डॉ.  अनुपमा पाटील, कुलसचिव वाय. के. पाटील यांनी कौतूक व अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here