पिंपरीपिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक सुरक्षित आणि सुरळीत करण्यासाठी चाकण व म्हाळुंगे एमआयडीसीकडून येणा-या अवजड वाहनांसाठी आयटी पार्क चौक तळवडे गावठाण चौक, त्रिवेणीनगर चौक या मार्गांवर सकाळी आठ ते अकरा आणि दुपारी चार ते सायंकाळी नऊ पर्यंत अवजड वाहनांना प्रवेश बंदी घालण्यात येणार आहे. यासंदर्भात आदेश तळवडे वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी काढला आहे. हा आदेश लागू करण्यापूर्वी नागरिकांना याबाबत काही सूचना असल्यास 11 ऑक्टोबरपर्यंत वाहतूक नियंत्रण शाखा यांच्या कार्यालयात लेखी स्वरुपात कळविण्याची, सूचना करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here