फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनची पोलीस आयुक्तांकडे मागणी
पिंपरी : औद्योगिक परिसर गुन्हेगारी मुक्त करा, अध्यक्ष अभय भोर यांची मागणी पोलिस आयुक्त संदीप बिष्णोई यांना मागणी फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनच्या प्रतिनिधींनी आज पिंपरीत पोलिस आयुक्त संदीप बिष्णोई यांची पोलिस आयुक्तालयात भेट घेतली. औद्योगिक परिसरातील गुन्हेगारीबाबत व समस्यांबाबत त्यांना निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी फोरम अध्यक्ष अभय भोर, उपाध्यक्ष कार्तिक गोवर्धन, उद्योजक मोहन बागमार, संजय कुलकर्णी, विजया टेमगिरे, उत्कर्षा कुलकर्णी, कौस्तुभ नारखेडे, सुमंत माळवतकर, संतोष गायकवाड, गुरप्पा माळी, राकेश सोनवणे, बाळकृष्ण थोरात, युवराज जगदाळे, विश्वानाथ टेमगिरे, गणेश विपट, जितेंद्र कुलकर्णी, मारुती बानेवार, दुर्गा भोर व अनेक उद्योजक उपस्थित होते.
या निवेदनात म्हटले आहे की, औद्योगिक परिसरात मोठ्या प्रमाणावर चोऱयांचे प्रमाण गुन्हेगारीचे प्रमाण वाढले. नुकतीच दिवाळीची सुट्टीला सुरुवात होणार आहे. त्यामुळे औद्योगिक परिसरात चोऱ्यांच्या प्रमाणात नक्कीच मोठी वाढ होईल. त्या अनुषंगाने लवकरच बैठक घेऊन त्यावर उपाययोजना करण्यात याव्यात, असे सांगण्यात आले. परिसरातकामगार वर्ग कामावून सुटल्यावर रात्रीच्या वेळी मोठय़ा प्रमाणात मोबाइल चोऱ्या, पाकिटमारी, महिलांची छेडछाड, तसेच भंगार चोरीची समस्या मोठ्या प्रमाणात आहे.
परिसरात अनधिकृत भंगारची दुकाने सुद्धा झाली आहेत. महानगरपालिका एमआयडीसी यांच्याबरोबर चर्चा करून परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, जेणे करून सुट्टीच्या काळामध्ये चोऱ्यांच्या प्रमाणामध्ये आळा बसेल. फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन असोसिएशन पोलिसांना सर्व सहकार्य करण्यास तयार असून लवकरच असोसिएशनतर्फे सुरक्षा रक्षक नेमण्यात येणार आहेत. काही मुख्य चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे नियोजन आहे. त्यात पोलीस सहकार्याची गरज आहे. आर्थिक मंदी, औद्योगिक मंदी, बेकारी मोठय़ा प्रमाणात झाली आहे. त्याचे परिणाम चोऱ्यांमध्ये वाढ होण्यास नक्की सुरुवात होणार असल्याचे दिसून येते. याला वेळीच आळा घालणे गरजेचे आहे, असे अभय भोर यांनी या निवेदनात म्हटले आहे.
आयुक्त बिष्णोई यांनी उद्योजकांना आपल्या कुठल्याही समस्या असल्यास कळवावे. त्यावर त्वरित कारवाई करण्यात येईल आणि लवकरच त्याबाबत अॅक्शन प्लॅन केला जाईल, असे सांगितले. यावेळी सहाय्यक आयुक्त आर पाटील, गुन्हे शाखेचे.अस्पत, यांच्याशीसुद्धा चर्चा करण्यात आली.