पिंपरी :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ‘ ग ‘ व ‘ ह ‘ क्षेत्रिय कार्यालय अंतर्गत प्रभाग क्र. ३२ जुनी सांगवी येथे शुक्रवारी (दि. ०४) रोजी महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने चालु असलेले अनधिकृत आर. सी. सी. व वीट बांधकामावर कारवाई केली.

या कारवाईमध्ये प्रभाग क्र. ३२, जुनी सांगवी येथील एका बांधकामांवर (अंदाजे १९२ चौ. मी) कारवाई करण्यात आली. सदर कारवाई कार्यकारी अभियंता सतीश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली उप-अभियंता हेमंत देसाई व इतर कनिष्ठ अभियंता, बीट निरिक्षक यांच्या पथकाने केली.

ही कारवाई आठ मनपा पोलीस, २ ब्रेकर, २ ट्रक व ७ मजूर यांच्या सहकार्याने करण्यात आली, अशी माहिती महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here