पिंपरी : पुढच्या पाच वर्षांत देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलर्सपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्राला महत्वपूर्ण योगदान द्यावे लागेल. त्यासाठी युवकांनी पुढे यावे असे आवाहन भारतीय जनता युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा खासदार पूनम महाजन यांनी केले.
भारतीय युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा खासदार पूनम महाजन यांनी शनिवारी (दि. 5 ऑक्टोबर) ‘कॉफी विथ यूथ’ या कार्यक्रमात शहरातील युवकांशी संवाद साधला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकालात झालेल्या विविध विकास कामांविषयी व पक्षाच्या आगामी ध्येयधोरणांविषयी खा. महाजन यांनी माहिती दिली.
पिंपळे सौदागर येथील एसएनबीपी इंटरनॅशनल स्कूल येथे झालेल्या या कार्यक्रमास भाजपा शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, ज्येष्ठ नेते आझम पानसरे, पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, प्रदेश भाजपा नेत्या उमा खापरे, भाजप नेते महेश कुलकर्णी, भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष नगरसेवक रवी लांडगे, नगरसेवक शत्रुघ्न काटे, तुषार कामठे, बाबू नायर, मोरेश्वर शेडगे, बाबा त्रिभुवन, चंद्रकांत नखाते, नगरसेविका सुनीता तापकीर, निर्मला कुटे, भाजप युवा मोर्चाचे प्रदेश सचिव अनुप मोरे, शहर सरचिटणीस व कार्यक्रमाचे मुख्य संयोजक दीपक नागरगोजे, युवती आघाडी शहराध्यक्षा तेजस्वीनी कदम, सरचिटणीस अजित कुलथे, महिला आघाडीच्या नेत्या वैशाली खाडे, आदी उपस्थित होते.
यावेळी महाजन म्हणाल्या की, काश्मिरपासून कन्याकुमारीपर्यंत सर्व युवकांना भारतावर प्रेम करण्याच्या विचारधारेशी जोडणे आवश्यक आहे. भारताचा सुवर्णकाळ येत आहे. या सुवर्णकाळात पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबर युवकांना जोडले जाणे आवश्यक आहे. देवेंद्र फडणवीस हे युवकांना संधी देणारे मुख्यमंत्री आहेत. त्याचा लाभ घेऊन युवकांनी सर्व क्षेत्रात पुढे यावे.
रवि लांडगे प्रस्ताविक करताना म्हणाले की, भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन व स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांशी स्नेहाचे संबंध होते. भाजपचे शहराध्यक्ष अंकुश लांडगे असताना महाजन यांनी 2002 च्या भोसरी येथे झालेल्या सभेत प्रमोद महाजन यांनी मतदारांना आवाहन करताना सांगितले की, प्रथम राष्ट्र, व्दितीय पक्ष आणि तृतीय व्यक्ती हे पाहून मतदान करा. पैशाकडे पाहून मतदान करू नका तर व्यक्तीकडे पाहून मतदान करा. या प्रमोद महाजन यांच्या विचारांवर भारतीय जनता पार्टीची पायी भरणी अंकुशराव लांडगे यांनी पिंपरी चिंचवड शहरात केली. आज राष्ट्रीय हित डोळ्यासमोर ठेवून काम करणारा भाजपा पक्ष पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसह राज्यात व देशात बहुमतात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे आगामी काळात युवकांचे भविष्य उज्वल आहे, असा विश्वास रवी लांडगे यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन युवा मोर्चा चिटणीस अमोल दामले, प्रस्ताविक रवी लांडगे यांनी केले. दीपक नागरगोजे यांनी आभार मानले.