पिंपरी | वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची सोमवारी पिंपरी-चिंचवड शहरात गुप्त बैठक झाली. बैठकीत राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष उमेदवार विलास लांडे आणि शिवसेनेचे बंडखोर राहुल कलाटे यांनी आंबेडकर यांची भेट घेतली. अद्याप त्यांच्यात काय चर्चा झाली हे समजू शकलेले नाही. मात्र, दोन्ही उमेदवारांनी वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा मिळावा यासाठी भेट घेतल्याचं म्हटलं जातं आहे.

दरम्यान, या प्रकरणी प्रकाश आंबेडकर यांच्याशी संपर्क साधला असता यावर उद्या (बुधवारी) निर्णय घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. जर वंचित कडून दोन्ही उमेदवारांना पाठिंबा मिळाला तर भाजपाच्या उमेदवारांना मोठा फटका बसल्याची शक्यता नाकारता येत नाही.

सोमवारी पिंपरी-चिंचवड शहरातील एका हॉटेलमध्ये राज्यातील वंचित बहुजन आघाडी च्या नेत्यांची गुप्त बैठक झाली. यात पक्षासंदर्भात बैठकीत चर्चा झाली असून त्यानंतर राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष उमेदवार विलास लांडे आणि शिवसेनेचे बंडखोर राहुल कलाटे यांनी प्रकाश आंबेडकर यांची वैयक्तिक भेट घेतली. त्यांच्यात पाठिंब्या विषयी सकारात्मक चर्चा झाल्याचं सांगण्यात येत असून या विषयी बुधवारी आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here