पिंपरी :- पिंपरी विधानसभेचे आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार यांचे फेसबुक अकाऊंट अज्ञात व्यक्तीने हॅक केल्याची घटना उघडकीस आली. यासंदर्भात तातडीने पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

येत्या २१ तारखेला होणाऱ्या विधानसभा निवडणूकीसाठी पिंपरी मतदारसंघातून शिवसेना-भाजप महायुतीच्या तिकिटावर आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार हे निवडणूक लढवित आहे. सोशल मीडियासाठी ते व त्यांचे विश्वासू कार्यकर्ते वापरत असलेले फेसबुक अकाऊंट काल सकाळी हॅक झाल्याचे या सर्वांच्या लक्षात आले. या अकाऊंटवरील मोबाईल नंबर, मेल आयडी, पासवर्ड व नावातही बदल केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे तातडीने आयुक्तालयातील सायबर क्राईमकडे याप्रकरणी आमदारांचे स्वीय सहाय्यक विजय जगताप यांनी लेखी तक्रार दाखल केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here