चिंचवड पृथ्वीराज थिएटर्स च्या वतीने पंडित भीमसेन जोशी यांचे सुपुत्र पंडित श्रीनिवास जोशी व नातू विराज जोशी तसेच विशेष गायक वंडर बॉय पृथ्वीराज यांच्या  ” सुगंध सुरांचा ”  या शास्त्रीय संगीत गायन मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे.

पिंपळे गुरव येथील नटसम्राट निळू फुले नाट्यगृहात शुक्रवारी (दि. ११) संध्याकाळी ५ वाजता  ही मैफील रंगणार आहे. या कार्यक्रमाला पुणे व पिंपरी- चिंचवड परिसरातील नामवंत कलावंत उपस्थित  राहणार आहेत. ही मैफल रसिकांसाठी विनामूल्य आहे. तरी रसिकांनी या संधीचा  लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here